शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
2
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
3
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
4
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
5
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
6
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
7
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
8
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
9
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
10
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
11
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
12
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
13
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
14
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
15
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
16
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
17
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
18
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
19
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
20
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन थाळीवाले पाच महिन्यांपासून उपाशी, कोल्हापूर जिल्ह्यात किती केंद्रे, थकीत अनुदान किती.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:01 IST

दिवाळीआधीच दिवाळे

कोल्हापूर : गरिबांचे पोट भरणारे शिवभोजन थाळी केंद्रचालकच गेल्या पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने उपाशी राहिले आहेत. तोंडावर दिवाळीचा सण असताना केंद्रचालकांचे आधीच दिवाळे निघाले आहे. जिल्ह्यात एकूण ५३ केंद्रे असून महिन्याला ६० लाख रुपये याप्रमाणे ३ कोटींचे अनुदान प्रलंबित आहे.गोरगरीब अगदी रस्त्यावर राहणाऱ्या माणसानेही उपाशीपोटी राहू नये यासाठी शासनाने शिवभोजन थाळी केंद्र सुरू केले. आतापर्यंत ही केंद्रे व्यवस्थित चालवली जात होती. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र अन्य योजनांप्रमाणे या योजनेसाठीही रक्कम कमी पडू लागली आहे. त्यामुळे केंद्रचालकांचे सहा महिन्यांचे अनुदान थकीत होते. त्यापैकी फक्त एक महिन्याची रक्कम काही दिवसांपूर्वी देण्यात आली.गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन थाळीवरील अनुदानच न मिळाल्याने राज्यभरातील १८०० पेक्षा अधिक शिवभोजन थाळी योजना केंद्रचालकांनी ठिकठिकाणी उपोषण करीत निदर्शने केली. यानंतर त्यांना २०० कोटींची थकबाकी देण्याचा निर्णय झाला; पण प्रत्यक्षात केवळ २१ कोटींवरच बोळवण करण्यात आली. जिल्ह्यातील केंद्र चालकांचे एप्रिलपासूनचे अनुदान थकीत होते त्यापैकी फक्त एप्रिल महिन्याचे अनुदान काही दिवसांपूर्वी देण्यात आले.

जिल्ह्यात ५३ केंद्रांत ६१०० थाळ्याजिल्ह्यात एकूण ५३ शिवभोजन थाळी केंद्रे असून त्यात सर्वाधिक संख्या करवीर म्हणजे शहरात आहे. या ५३ केंद्रांमधून रोज ६१०० थाळ्या दिल्या जातात. या थाळीत १० रुपयांत जेवण दिले जाते.

महिन्याला ६० लाख रुपयेशहरातील केंद्रचालकांना थाळीमागे ४० रुपये, तर ग्रामीण भागातील केंद्र चालकांना ३५ रुपये अनुदान दिले जाते. जिल्ह्यासाठी दर महिन्याला ६० लाख रुपये अनुदान लागते.

गेल्या पाच महिन्यांपासून थाळीचे अनुदान मिळालेले नाही. दिवाळीचा सण तोंडावर आहे. किराणा दुकानदारांकडे उधारी करून तरी किती करायची. पुन्हा साहित्य न्यायला त्यांच्या दारात जायचे म्हणजे नको वाटते. शासनाने ही अडचण ओळखून लवकरात लवकर अनुदान द्यावे. - शिवभोजन केंद्रचालक

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Shiv Bhojan Thali centers struggle amid unpaid dues.

Web Summary : Kolhapur's Shiv Bhojan Thali operators face hardship due to five months of unpaid subsidies. 53 centers serve 6100 meals daily, needing ₹60 lakh monthly. ₹3 crore is pending, impacting Diwali celebrations.