शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
2
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
3
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
4
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
5
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
6
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
7
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
8
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
9
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
10
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
11
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
12
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
13
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
14
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
15
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
16
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
17
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
18
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
19
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
20
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत रस्त्यावर वाढली ७ हजारांवर दुचाकी, चारचाकी वाहने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:02 IST

ईलेक्टिक वाहनांच्या संख्येतही वाढ

सचिन यादवकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात २०२५ या वर्षात वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०२४ च्या तुलनेत ७ हजार १२५ वाहनांची संख्या वाढली आहे. २०२४ मध्ये ६३ हजार ६७६ वाहनांची नोंदणी झाली होती. २०२५ मध्ये ही संख्या ७० हजार ८०१ इतकी झाली आहे. तर ईलेक्ट्रिक वाहनांना कोल्हापूरकरांनी पसंती दिली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ३ हजार २२७ वाहने वाढली आहेत. जिल्ह्यात २०२५ मध्ये ईलेक्ट्रिक वाहनांची संख्या ११ हजार १७ इतकी झाली आहे.नवीन वर्षात, विशेषतः २०२५ मध्ये, वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे; सणासुदीच्या काळात जीएसटी कपातीमुळे विक्रीत मोठी वाढ झाली असून, दररोज सरासरी २०० नवीन वाहने (कार आणि दुचाकी) रस्त्यावर येत आहेत. तीस वर्षांपूर्वी एखाद्या गावात एकमेव चारचाकी, बोटावर मोजण्याइतक्याच दुचाकी दिसायच्या. काही वर्षांपूर्वी दुचाकीसाठी नंबर लावावा लागत होता. त्याची डिलिव्हरी तीन महिन्यांनंतर ग्राहकांना मिळत होती.

आता घरातील प्रत्येक सदस्यांकडे दुचाकी, सरासरी प्रत्येक घरात चारचाकी आहे. काहींकडे पेट्रोलसह ईलेक्ट्रिक बाइकही आहे. केवळ आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, कमीत कमी डाऊन पेमेंट आणि त्यासाठी अनेक बँका, फायनान्सचे कर्ज ग्राहकांना सहजासहजी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

ईलेक्ट्रिक वाहने वाढलीसन २०२५ मध्ये ईलेक्ट्रिक वाहनांची संख्या ११ हजार १७ इतकी झाली आहे. त्यात ई-दुचाकी १० हजार ४४५, तीनचाकी २८, कारची संख्या ५४४ इतकी आहे.

गेल्या पाच वर्षांतील वाहनांच्या नोंदणीची आकडेवारी

  • २०२१- ४३२८२२०२२- ५०३९५
  • २०२३- १०४२५८
  • २०२४- ६३६७६
  • २०२५- ७०८०१

वाहने का वाढलीजीएसटी कपात : सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये जीएसटीमध्ये झालेल्या कपातीमुळे वाहनांच्या किमती कमी झाल्या. ज्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वाहने खरेदी केली.सणासुदीची मागणी : दसरा आणि दिवाळीच्या काळात वाहन विक्रीने मागील सर्व विक्रम मोडले, विशेषतः दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी वाढली.कर्जाची सुलभता : वाहन खरेदीसाठी कर्ज मिळणे सोपे झाल्याने, अनेक कुटुंबांनी नवीन वाहने घेतली, ज्यामुळे वर्षागणिक ७ हजारांवर वाहनांची भर पडत आहे.

२०२५ मधील प्रमुख वाहन नोंदणी

  • दुचाकी - ४३ हजार २७६
  • मोटार कार - ११०९७
  • ऑटो रिक्षा - ६१४
  • ट्रक - ४७०
  • डिलिव्हरी व्हॅन - १६२८
  • ट्रॅक्टर्स - ३३८
  • ट्रेलर - ३३८

गेल्या वर्षीच्या वाहन नोंदणीच्या तुलनेत २०२५ मध्ये वाहनांच्या नोंदणीच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. सुलभ कर्ज, वाढती गरज, आणि जीएसटी कपात ही त्याची काही महत्त्वाची कारणे आहेत. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Sees 7,000+ Vehicle Increase Over Last Year

Web Summary : Kolhapur witnessed a surge of over 7,000 vehicles in 2025 compared to 2024, fueled by GST cuts, festive demand, and easy loan availability. Electric vehicle adoption also significantly increased.