शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

कोल्हापूरकरांनो सावधान!, कोरोना पुन्हा परतला, सक्रिय रुग्णसंख्या आठ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:14 IST

सीपीआरमध्ये स्वतंत्र विभाग, केंद्रासह राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या आठवर पोहोचली असून, केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार राज्य शासनानेही महापालिका आणि जिल्हा परिषद तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांना सोमवारी पत्रे पाठवून दक्षता आणि सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनीही दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.आतापर्यंत जिल्ह्यात १४ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील एका महिलेचा मृत्यू झाला असून, पाच जणांची तब्येत ठणठणीत झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सीपीआरमध्ये दाखल वृद्धेचा रविवारी मृत्यू झाला. आता एकही रुग्ण सीपीआरमध्ये दाखल नसून उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल आहेत तर काही घरी उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे.

सहव्याधी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नयेहाताची, श्वसन स्वच्छता, खोकण्याचे शिष्टाचार यासारख्या स्वच्छतापूर्ण वर्तनाचे समुदायाने पालन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जाणीव जागृती करण्याचे उपक्रम हाती घ्यावेत. सहव्याधी असणाऱ्या नागरिकांनी किंवा रोगप्रतिकारशक्तीची कमतरता असलेल्या लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, असे राज्य शासनाच्या सोमवारच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

ऑक्सिजनची तयारी ठेवामहापालिका, जिल्हा परिषदांच्या आणि शासनाच्या रुग्णालयांचा आढावा घेण्याच्याही सूचना करण्यात आल्या असून, ऑक्सिजनची सुविधाही सज्ज आहे का? याचीही पाहणी करण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यक औषधे, आयसोलेशन बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर बेडची तयारी ठेवण्याबाबतही अधोरेखित करण्यात आले आहे.

कोरोना लागण स्थिती१४ मे : ०१३१ मे : १४मृत्यू : ०१डिस्चार्ज : ०५सर्व रुग्ण खासगी रुग्णालयात..

मास्क बाहेर काढा..हा तीव्र स्वरूपाचा कोरोना नसला तरी आधीच व्याधीग्रस्त असलेल्या नागरिकांना याची लागण लवकर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्यांना जुन्या व्याधी आहेत, त्यांनी बाहेर फिरताना मास्क घालूनच बाहेर पडावे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

सीपीआरमध्ये कोरोनावरील उपचारासाठी ३५ बेडचा स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून, याठिकाणी कोरोना काळातील प्रक्रियेची सर्व तयारी करण्यात आली आहे. सोमवारी कोरोनाचा एकही रुग्ण सीपीआरमध्ये दाखल नाही. याठिकाणी व्हेंटिलेटरचीही सुविधा तयार ठेवण्यात आली आहे. - डॉ. एस. एस. माेरे, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय