शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
3
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
4
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सु्टी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
5
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
6
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
7
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
8
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
9
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
10
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
11
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
12
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
13
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
14
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
15
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
16
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
18
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
19
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
20
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Local Body Election: हातकणंगलेत बहुरंगी लढती; महायुती दुभंगली तर आघाडीत बिघाडी झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:33 IST

नगराध्यक्ष पदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी ७८ उमेदवार रिंगणात

हातकणंगले : येथील नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी ७ तर नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ७८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासोबतच नगरसेवक पदासाठीही बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. महायुती दुभंगली तर महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष स्वबळ अजमावत आहेत. खुले नगराध्यक्षपद असल्याने जोरदार चुरस निर्माण झाली आहे.लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी एकूण १२ आणि नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी एकूण १५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. नगराध्यक्ष पदासाठी भाजप, शिंदेसेना, काँग्रेस, उद्धवसेना आणि अजित पवार गट अशी पंचरंगी लढत होणार आहे. गेल्या तीन दिवसात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत नगराध्यक्ष पदासाठी ५ आणि नगरसेवक पदासाठी ७३ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतला. अनेक प्रभागांमध्ये माघारीसाठी उमेदवारांची मनधरणी करण्यात आली. साम, दाम, दंड या सर्व प्रकारांचा वापर झाला तरीही बहुरंगी लढती निश्चित झाल्या आहेत.नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून राजू जयसिंगराव इंगवले, शिंदेसेनेकडून अजितसिंह रामगोंडा पाटील, काँग्रेस व शरद पवार गटाकडून दीपक दगडू वाडकर, उद्धवसेनेकडून अभिषेक प्रसाद पाटील, तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून दीपक वसंतराव कुन्नूरे हे पाच पक्षांचे आणि दोन अपक्ष उमेदवार थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत. तर १७ प्रभागांमध्ये नगरसेवक पदासाठी पाच राजकीय पक्षांसह अपक्ष असे एकूण ७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Multi-cornered Fights in Hatkanangle; Alliances Fractured in Local Body Polls

Web Summary : Hatkanangle Nagar Panchayat election sees multi-cornered fights for both president and corporator posts. Major alliances fractured, with parties contesting independently. Intense competition for open president post is expected.