शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांकडे विकासाचे नियोजन नाही - हाळवणकर; इचलकरंजीत महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:01 IST

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून येणारा निधी खेचून आणत शहराचा कायापालट करण्याचे नियोजन आमच्याकडे तयार

इचलकरंजी : शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक सर्व कल्पना आणि नियोजन आराखडा आमच्याकडे आहे. विरोधकांकडे विकासाचे काहीही नियोजन नाही, निधी नाही. ते फक्त विरोधाला विरोध करीत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केला. इचलकरंजी भाजप कार्यालयात महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, इचलकरंजीला केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर पाणी, रस्ते, विद्यार्थी, शिक्षण, उद्यान, उद्योग अशा सर्व बाबींवर आमचे काम सुरू आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून येणारा निधी खेचून आणत शहराचा कायापालट करण्याचे नियोजन आमच्याकडे तयार आहे.

वाचा: मूळ भाजपवाले कोठे आहेत, ते शोधा, सतेज पाटील यांनी लगावला टोला; इचलकरंजीतील पाणी प्रश्नावरुन दिलं थेट आव्हानमहायुतीच्या प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात पाणीपुरवठ्याचे सुसूत्रीकरण करून नियमितता आणणार, व्यापाराला प्रोत्साहन, ई-बस सुविधा, खेळाला प्रोत्साहन, पूरस्थितीवर उपाययोजना, रस्ते सुधारणा, आरोग्य सेवा, सौरदिवे, आदी बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर अखेरच्या पानावर शिवतीर्थचा दुसरा टप्पा, धार्मिक स्थळे, मंदिरे, आध्यात्मिक केंद्रांचे नूतनीकरण, सेफ सिटीअंतर्गत सीसीटीव्ही बसविणार, क-१ शेरा काढणे व शास्ती माफ करणे, प्रशासकीय कार्यालये ‘व्हाय-फाय’ने जोडणे असे मुद्दे मांडले आहेत. यावेळी आमदार राहुल आवाडे व संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. शशिकांत मोहिते यांनी आभार मानले.

१०० फुटी ध्वज उभारणारशहापूर चौकाचा विस्तार करून तेथे १०० फुटी भगवा ध्वज उभारणार. तसेच महात्मा गांधी पुतळा येथे १०० फुटी तिरंगा ध्वज उभारणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे.जुन्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्तीकृष्णा आणि पंचगंगा या दोन्हीही जुन्या नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती अंतिम टप्प्यात आली आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात अतिरिक्त ४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी दिले जाणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Opposition lacks development plan: Halavankar; Mahayuti manifesto released.

Web Summary : Halavankar criticized the opposition for lacking a development plan. Mahayuti's manifesto prioritizes water, roads, education, and industry. It promises improved water supply, trade promotion, e-bus services, and solutions for flooding. The manifesto also includes plans for renovating religious sites and installing CCTV cameras.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुती