शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: महायुतीत ३३-३३-१५ चे समीकरण, शिंदेसेनेच्या आज मुलाखती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 15:28 IST

भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादीकडून उपसमित्यांची स्थापना

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी निश्चितीला शुक्रवारी गती आली आहे. येथील एका विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत शिंदेसेना ३३, भाजप ३३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १५ अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. याच बैठकीत तीनही पक्षांकडून तीन उपसमित्यांची स्थापना करण्यात आली असून, यापुढची चर्चा या उपसमित्यांमध्ये होऊन अंतिम निर्णयासाठी नेत्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या बैठकीला तपशील संध्याकाळीच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर करण्यात आला आहे.या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, जयंत पाटील उपस्थित होते. शिंदेसेनेच्या उपसमितीमध्ये युवासेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा समन्वयक सत्यजित ऊर्फ नाना कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, तर भाजपच्या वतीने आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील व प्रमुख पदाधिकारी उपसमितीमध्ये असतील. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष आदिल फरास, महेश सांवत, संदीप कवाळे यांचा उपसमितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तीनही उपसमित्यांची आज शनिवारी बैठक होणार आहे.

उपसमिती करणार चाचपणीकोणत्या प्रभागात निवडून येण्याची क्षमता नेमकी कोणाकडे आहे, याची ही उपसमिती चाचपणी करणार आहे. त्यानुसार किती जागांवर कोण लढणार, याची प्राथमिक चर्चा केली जाणार आहे. प्रमुख नेत्यांशी चर्चा करताना अधिकाधिक जागांचा गुंता सोडवूनच समोर जायचे, यासाठी या उपसमित्या नेमण्यात आल्या आहेत.

भाजपमध्ये एकमतासाठी प्रयत्नभाजपच्या माध्यमातून ताराराणी आघाडीचे काही माजी नगरसेवकही इच्छुक असल्याने भाजपमध्येच एकमत करण्यासाठी दिवसभर प्रयत्न सुरू होते. त्यामुळे प्रा. जयंत पाटील हे खासदार धनंजय महाडिक यांच्याशी मोबाइलवरून संपर्कात होते. तर आमदार अमल महाडिक यांच्याशी ते प्रत्यक्ष चर्चा करत होते.

चंद्रकांत पाटील यांनी पक्ष कार्यालयात घेतला आढावामिरजेहून दुपारी साडेतीननंतर मंत्री चंद्रकांत पाटील हे मकरंद देशपांडे यांच्यासह नागाळा पार्कातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात आले. या ठिकाणी त्यांनी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. यावेळी पाटील यांनी एकूणच निवडणुकीच्या रणनीतीबाबत निवड पदाधिकारी आणि अन्य मान्यवरांशी चर्चा केली.

शिंदेसेनेच्या आज मुलाखतीशिंदेसेनेच्या संपर्क कार्यालयातून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत १९६ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. प्रभाग क्रमांक १ मधून तृतीयपंथी इच्छुकानेही अर्ज नेला आहे. तर शुक्रवारअखेर १२५ अर्ज जमा करण्यात आले आहेत. सर्वाधिक अर्ज हे प्रभाग क्रमांक १६ मधून, तर सर्वांत कमी प्रभाग क्रमांक २ मधून नेण्यात आले आहेत. या सर्वांच्या मुलाखती खानविलकर पेट्रोलपंपाजवळील संपर्क कार्यालयात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत प्रभाग क्रमांक १ ते १० च्या, तर दुपारी २ नंतर प्रभाग क्रमांक ११ ते २० च्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Elections: Alliance talks on seats, Shinde Sena interviews today.

Web Summary : Kolhapur's upcoming municipal elections see alliance talks prioritizing seat sharing between Shinde Sena, BJP, and NCP. Subcommittees formed for candidate selection. Shinde Sena conducts interviews today.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६MahayutiमहायुतीPoliticsराजकारण