शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेअर्स खरेदीने ८० टक्क्यापर्यंत फायद्याचे आमिष, कोल्हापुरात डॉक्टरला कोटीचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 16:50 IST

कोल्हापूर : शेअर्स मार्केटमधील अमेरिकन नामांकित कंपनीच्या शेअर्स खरेदी विक्रीच्या नावाखाली न्यू महाद्वार रोडवरील डॉ. नितीन प्रभाकर देशपांडे यांची ...

कोल्हापूर : शेअर्स मार्केटमधील अमेरिकन नामांकित कंपनीच्या शेअर्स खरेदी विक्रीच्या नावाखाली न्यू महाद्वार रोडवरील डॉ. नितीन प्रभाकर देशपांडे यांची १ कोटी १० लाख ९४ हजार ४१८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी त्या कंपनीसह प्रोफेसर ध्रुव पारेख आणि लिंडा या महिलेवर गुन्हा दाखल केला. गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याने जुना राजवाडा पोलिसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले.जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. देशपांडे यांना फेसबुक आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर बाजारातील मोठी अमेरिकन कंपनीची शेअर्स खरेदीची ऑनलाइन जाहिरात बघितली. त्यानंतर संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी झाले. या ग्रुपचे ॲडमिन प्रोफेसर ध्रुव पारेख आणि लिंडा नावाची महिला आहे. या दोघांनी कंपनीची जाहिरात करून शेअर्स खरेदी केल्यास २० ते ८० टक्के परतावा मिळेल, असे सांगितले. कंपनी नामांकित असल्याने गुंतवणूकीतून एक हजार टक्के फायदा मिळेल, अशा भूलथापा संशयितांनी मारल्या. त्यावेळी देशपांडे यांना शंका आल्याने त्यांनी कंपनीविषयी अधिक माहिती देण्यास सांगितले. लिंडा या महिलेने रजिस्टर स्टॉक ब्रोकर म्हणून या कंपनीचा नोंदणीकृत क्रमांक आयएनझेड ०००२४४४४३८ हा खोटा क्रमांक पाठविला. कंपनी नोंदणीकृत असल्याचा समज डॉ. देशपांडे यांचा झाल्याने त्यांनी ऑनलाइन व्यवहार करण्यास सुरुवात केली. त्यांनी दहा ते बारा टप्प्यात १ कोटी १० लाख ९४ हजार ४१८ रुपयांची रक्कम एनईएफटी आणि आयएमपीएसद्वारे १६ एप्रिल २०२४ ते १७ मे या कालावधीत वर्ग केली. त्यानंतर डॉ. देशपांडे यांना परतावा देण्यास संबंधितांनी टाळाटाळ केली. दिलेली रक्कम परत मागितली असता ती देण्यास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की तपास करत आहे.

सॉफ्टवेअरवर १४ कोटींची रक्कमगुंतविलेल्या रकमेचा जादा परतावा म्हणून १ कोटी १० लाखांच्या बदल्यात सॉफ्टवेअरवर १४ कोटींची रक्कम झाल्याचे निदर्शनास आले. ऑनलाइन ग्रुपवरही मोठा परतावा मिळणार असल्याचे आमिष दाखविले गेले. मात्र परतावा मिळाला नसल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

शेकडो जणांच्या फसवणुकीची शक्यताकंपनीचे अधिकृत कार्यालय मुंबईतील गोरेगाव येथे असल्याचे समजते. संबंधित प्रकरण मुंबई पोलिसांना कळविले आहे. अमेरिकन स्थित कंपनीच्या नावाखाली ऑनलाइन चोरट्यांनी अनेकांना गंडा घातल्याचे समजते. फसवणुकीची ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे समजते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdoctorडॉक्टरshare marketशेअर बाजारfraudधोकेबाजी