शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हत्तींच्या वावरामुळे चंदगडच्या शेतकऱ्यांच्या जिवाला घोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:36 IST

शेतीच नको, अशी म्हणण्याची वेळ 

निंगाप्पा बोकडेचंदगड : सिंधुदुर्ग जिल्हा, कर्नाटक हद्दीत व पुढे अनेक गावांचा प्रवास करत २५ वर्षांपूर्वी चंदगड तालुक्यातील पश्चिम भागात पोहोचलेल्या हत्तीने अलीकडील काही वर्षांत आपला मोर्चा पूर्व भागाकडेही वळविला आहे. शेतीसह वाहनांवर थेट हल्ले यात पाचजणांना जीव गमवावा लागल्याने शेतकरी पुरता घाबरला असून त्याच्यापासून आपल्या शेतीचे संरक्षण करताना तो मेटाकुटीला आल्यामुळे ती शेतीच नको, अशी म्हणण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.सुगीच्या हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरंगे जंगलात असलेले हत्ती कर्नाटक हद्दीतील जंगलातून दरवर्षी कणकुंबी-ओलमणी या गावाचा प्रवास करत खानापूर तालुक्यातील जांभेगाळी-देवराई गावाजवळील जंगलातून चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात येत आहेत. त्यांनी हाजगोळी, कळसगादे, पाटणे, जेलुगडे, कलिवडे, हेरे, खामदळे, कानूर, पिळणी भागात नुकसान चालविले आहे.आता तर या हत्तीने आपला मोर्चा पूर्व भागाकडे वळवत चिंचणे, कामेवाडी, होसूर, कर्नाटक हद्दीतील बेकिनकरे, अतिवाड या गावात धुडगूस घातला आहे. तालुक्यातील पश्चिम भागात ऊस, केळी, रताळी या पिकांवर ताव मारायला मिळत असल्याने त्याने आपला मोर्चा या भागात कायम ठेवला आहे. त्यानंतर पूर्वभागातील ऊस, केळी व इतर खाद्यही त्याला गोड लागल्याने त्याने आपला मुक्काम तिकडेही वाढविला आहे, पण अलीकडे त्याने शिवारातील धुडगूससोबत वाहनांवर हल्ले, बैलगाडी, ट्रॅक्टरचे नुकसान चालविले आहे. त्याचा आक्रमकपणा वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.पाटणे व चंदगड वनविभागाकडून वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले जातात, पण हत्ती, गवे, रानडुक्कर व इतर प्राण्यांचा उपद्रव इतका वाढला आहे की, पंचनामा करण्यापलीकडे त्यांच्याकडे प्रभावी उपाययोजना नाही.

खाद्याची सोय जंगलात करण्याची मोहीमतालुक्यात जंगलात सर्व प्रकारचे वन्यप्राणी जंगलात आहेत. त्यांच्या खाद्याची सोय जंगलात होत नसल्याने त्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे तो कमी करण्यासाठी वनविभागाकडून त्यांच्या खाद्याची सोय जंगलात करण्याची मोहीम सुरू केली आहे. येत्या काही वर्षांत त्यामध्ये यशस्वीही होऊ, पण त्याला थोडा वेळ लागणार असल्याचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी सांगितले.

हत्तींवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न

हत्तींवर नियंत्रण करण्यासाठी ट्रंक काॅल द वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून आनंद शिंदे यांचे तालुक्यात काम सुरू होते. त्याचे चांगले परिणाम दिसून येत होते. अजून काही वर्षे त्यांना संधी दिली असती तर अजून खूप चांगले परिणाम पाहावयास मिळाले असते, पण शासनाने त्यांचा करार पुढे चालू न ठेवल्याने त्यांनी काम थांबविले आहे. त्यामुळे हत्तींवर नियंत्रण मिळवायचे झाल्यास या संस्थेला आणखी काही वर्षे संधी देणे गरजेचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगडforestजंगलAnimalप्राणीFarmerशेतकरी