शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: काजव्यांची लूकलूक.. अवकाळीमुळे झाली अंधूक; पर्यटकांची निराशा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:24 IST

दाट झाडीच्या ठिकाणी अस्तित्व : जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चमचम

आदित्य वेल्हाळकोल्हापूर : वळवाचा पाऊस पडला की, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड या जंगलमय परिसरात काजव्यांचा लूकलूकाट पाहायला मिळतो. मात्र, यंदा याच काळात अवकाळी पाऊस जोरदार बरसल्याने काजव्यांचा प्रकाश अंधूक झाला. त्यामुळे यंदा नागरिकांना काजव्यांची लूकलूकणारी दुनिया पाहण्याची संधी अवकाळीने हिरावून घेतल्याचे चित्र आहे.प्रत्येक वर्षी वळीव पाऊस पडून झाल्यानंतर मान्सून पाऊस सुरू होण्याआधीच्या मधल्या काळात काजव्यांचा मिलनाचा काळ मानला जातो. काजवे हे त्याच्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी किंवा शिकारीसाठी चमकतात. याच काळात जिल्ह्यातील जंगल परिसरात काजव्यांची चमचमणारी दुनिया पाहायला मिळते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी काजवा महोत्सव भरवला जातो. तो पाहण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील पर्यटक कोल्हापुरात येत असतात. मात्र, यंदा काजवे कमी प्रमाणात चमकल्याने पर्यटकांची निराशा झाली आहे.

रात्रचरी हेच काजवे चमकणारेजगभरात काजव्यांच्या दोन हजार प्रजाती आहेत. काजवे हिवाळा व कडक उन्हाळ्यात निद्रावस्थेत जातात. मिलनानंतर मादी जवळपास शंभर अंडी घालते. यातून बाहेर पडणाऱ्या अळ्यांना ग्लोवर्म असे संबोधले जातात. विशेष म्हणजे दिनचर व निशाचर असे काजव्यांचे दोन प्रकार आढळतात. निशाचर हेच काजवे चमकतात.

जिल्ह्यात यंदा अनेक ठिकाणी काजवे चमकले नाहीत. काही ठिकाणी काजवे चमकले, परंतु त्याचे प्रमाण कमी आहे. अवकाळी पावसामुळे काजवे मिलनासाठीची अनुकूल परिस्थिती तयार झाली नसल्याने अडथळे आले. अनुकूल परिस्थिती तयार झाली तर काजवे पुन्हा चमकतील. - डॉ. प्रकाश भोजे, विभागप्रमुख प्राणिशास्त्र, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, वारणानगर.