शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचा तिढा सुटता सुटेना, ग्रामस्थांची मानसिकता आड 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 29, 2023 12:43 IST

प्रत्येक वर्षी महापूर आला की त्याची चर्चा होते आणि पूर ओसरला की ती हवेत विरून जाते.

इंदुमती गणेशकोल्हापूर : पूरग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सरकारने जागा दिली पाहिजे, जागा मिळाली तरी आम्ही जुन्या घराचा ताबा शासनाला परत देणार नाही. पूर येईल तेवढ्यापुरते शासनाच्या जागेत आणि इतर वेळी गावच्या घरात राहतो, या मानसिकतेमुळे प्रयाग चिखली, आंबेवाडीसह पूरग्रस्त गावांचे कायमचे पुनर्वसन रखडले आहे.गावातील मजबूत पिढ्यानपिढ्या राहत असलेली घरे सोडून माळावर जायला कोणीही ग्रामस्थ तयार होत नाहीत. सरकार म्हणते गावातील घरे सरकारच्या नावांवर करा, मगच तुमचे पुनर्वसन करतो, असा पेच तयार झाला आहे. प्रत्येक वर्षी महापूर आला की त्याची चर्चा होते आणि पूर ओसरला की ती हवेत विरून जाते.पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पूरबाधितांना सोमवारी तुम्ही राहते घर ताब्यात दिले तरच दुसरी जागा देऊन कायमस्वरूपी पुनर्वसन करू अन्यथा तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली जाईल असे स्पष्ट केले आहे. यावर आता गावांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. कोल्हापुरात २०१९ सालापासून एक वर्ष आडाने पूर येत आहे.

करवीरमधील प्रयाग चिखली, आंबेवाडी, वळिवडे ही गावे कायम पुराच्या छायेखाली असतात. त्यातील प्रयाग चिखली व वळिवडे येथील नागरिकांना कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी भूखंडाचे वाटप झाले आहे. पण वाटप झालेल्या भूखंडाची अवैध विक्री करून ग्रामस्थ पूरबाधित होणाऱ्या गावठाण भागातल्या जुन्या घरातच राहत आहेत. अनेक जण पूर आला की शासनाने दिलेल्या जागेत जाऊन राहतात आणि पूर ओसरला की पुन्हा गावात येतात असा अनुभव आहे. म्हणजे सरकारी जमीन तर हवी, पण जुने घरही सोडणार नाही, अशी ग्रामस्थांची मानसिकता आहे.

गाव म्हणून निर्णय घ्या...पालकमंत्री सोमवारी दिलेल्या भेटीदरम्यान ग्रामस्थांना एका पर्यायाची निवड करा असे सांगितले आहे. कायमचे पुनर्वसन हवे तर राहते घर, जागा सरकारच्या ताब्यात द्या, पूर आल्यावर तात्पुरते स्थलांतर करायचे असेल तर निवारा शेड उभारल्या जातील, त्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल, पण गाव म्हणून सगळ्यांनी एकच निर्णय घ्या.

ताबा दिला की सातबारावर नाव लावणारशासनाने प्रयाग चिखली ग्रामस्थांसाठी १९८९ साली जमिनीचे प्लॉट पाडले होते. त्या सगळ्या सरकार नावे ठेवण्यात येणार आहेत. जे कुटुंब आपले राहते घर प्रशासनाच्या ताब्यात देईल. त्याचवेळी प्रशासन नव्या जागेच्या सातबारावर कुटुंबाचे नाव लावणार आहे.

शर्तभंगाचे प्लॉट परत घेणारशासनाने ग्रामस्थांना दुसरी जागा राहण्यासाठी दिली आहे. त्याची विक्री करून जुन्या घरात राहणे हे बेकायदेशीर व शर्तभंग करणारे आहे. अशा शर्तभंग झालेल्या जमिनी पुन्हा सरकार हक्कात घेतल्या जाणार आहेत.

पूरबाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी शासन सकारात्मक आहे. त्यासाठीच्या अटी-शर्तींची पूर्तता करून जे घराचा ताबा देतील त्यांचे नाव लगेचच सरकारी जमिनीच्या सातबारावर लावले जाईल. - स्वप्निल रावडे, तहसीलदार, करवीर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर