शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

"इथं थांबून उपयोग नाही, मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधानांपर्यंत पोहोचला पाहिजे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 21:01 IST

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील घडामोडींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे

मुंबई/कोल्हापूर - राज्यातील मराठाआरक्षणाचा विषय गंभीर बनला असून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. सरकारला १ महिन्यांचा कालावधी देण्यास आपण तयार आहोत. मात्र, त्यासाठी काही अटी असल्याचं सांगत जरांगे पाटील यांनी मराठाआरक्षणाच्या उपोषणावर भाष्य केलं. राज्य सरकारने १ महिन्यांचा कालावधी मागितला असून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढू, सरकार याबाबत गंभीर व सकारात्मक असल्याचं शासनाच्यावतीने सांगण्यात येते. मात्र, यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा आणि कृती व्हायला हवी, असेच सूतोवाच शाहूराजे छत्रपतींनी केले आहेत. 

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील घडामोडींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यानुसार, याबाबत अनेक नेत्यांकडून, वरिष्ठांकडून आणि मराठा समाजातील अभ्यासकांकडून भाष्य केले जाते. आता, छत्रपती शाहू महाराजांचे वंशंज शाहूराजे छत्रपती यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे. राज्यात आणि केंद्रात महायुतीचं सरकार आहे, एकमताचं सरकार आहे. त्यामुळे, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायद्यात आवश्यकत ती घटनादुरुस्ती करुन आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यासाठी, हा विषय आता पंतप्रधानांपर्यंत गेला पाहिजे, असे स्पष्ट मत शाहू महाराजांचे वंशज छत्रपती शाहूराजे यांनी व्यक्त केले, एबीपी माझाशी बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली.  

पंतप्रधानांपर्यंत हा विषय न्यावाच लागेल, घटनात्मक दुरुस्ती आवश्यकतेनुसार करुन घ्यावीच लागेल. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंत देण्यात आलेली आहे, ती ८५ टक्क्यांपर्यंत कशाप्रकारे नेता येईल. तसेच, त्यामध्ये कोण-कोण बसवायचं हे कायदेतज्ज्ञ सांगतीलच. परंतु, त्यासाठीची जी घटनादुरुस्ती ती करुन घ्यावीच लागेल, ती ताकदही त्यांच्याकडे आहे, असे म्हणत छत्रपती शाहू राजेंनी हा विषय केंद्र सरकारकडून सुटू शकतो, असे सुतोवाच केले. 

राज्यात जे आदेश काढले जातात, किंवा इथं ज्या घडामोडी घडत आहेत, त्यासंदर्भात प्रश्न विचारला असता. मला वाटतं बेसला गेलं पाहिजे, आवश्यक त्या घटनादुरूस्ती केल्या पाहिजेल, इथल्या इथं थांबून उपयोग नाही, त्यांनी पंतप्रधानांपर्यंत पोहोचलं पाहिजे, असेही शाहूराजेंनी म्हटलं.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षणmarathaमराठाShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती