शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

इचलकरंजीतील जखमी न्यायाधीशांचा मृत्यू, दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत झाले होते गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 16:22 IST

अपघाती निधनामुळे हळहळ

अतुल आंबी

इचलकरंजी : मोटारसायकलस्वाराने दिलेल्या धडकेत यड्राव (ता.शिरोळ) जवळ जखमी झालेले अतिरिक्त जिल्हा तथा सत्र न्यायाधीश आर. एन. आंबटकर यांचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. पंधरा दिवसांपूर्वी हा अपघात झाला होता. त्यावेळेपासून कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज, शुक्रवारी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.यड्राव (ता.शिरोळ) येथील पार्वती विद्यामंदिरजवळ न्यायाधीश आंबटकर राहत होते. २१ मार्चला नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून ते शतपावली करण्यासाठी यड्राव-जांभळी मार्गावर फिरत होते. त्यावेळी अनिल रामचंद्र जाधव (रा.जांभळी) या मोटारसायकल (एमएच ०९ डीडी ९६४५) स्वाराने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर आपटून गंभीर जखमी झाले. उपस्थित नागरिकांनी त्यांना इचलकरंजीतील रुग्णालयात उपचारासाठी हलवले. तेथून प्रकृती गंभीर असल्याने तत्काळ कोल्हापुरातील रुग्णालयात नेऊन तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. शुक्रवारी सकाळी दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू