शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ए.एस ट्रेडर्स फसवणुकीचा तपास कुठपर्यंत आला?; १४ जूनपूर्वी प्रतिज्ञापत्र द्या, उच्च न्यायालयाचे अधिकाऱ्यांना निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 16:12 IST

फिर्यादीची तपासाबद्दल नाराजी

कोल्हापूर : ए.एस. ट्रेडर्स कंपनीने केलेल्या फसवणुकीचा तपास कुठपर्यंत आला, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, १० मे रोजी झालेल्या सुनावणीत तपास अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. याची गंभीर दखल घेऊन न्यायाधीश अमित बोरकर यांनी तपास अधिकाऱ्यांना १४ जूनपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, फिर्यादी रोहित ओतारी यांनी उच्च न्यायालयात अर्ज सादर करून तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली.कमी कालावधित मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून ए.एस. ट्रेडर्स कंपनीने गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू असून, कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार याच्यासह १५ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्याशी संबंधित इतर २० हून अधिक संशयितांचा शोध सुरू आहे. यातील अमित शिंदे, बाळासो धनगर आणि साहेबराव धनगर यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांकडे आजपर्यंत झालेल्या तपासाबद्दल प्रतिज्ञापत्राची मागणी केली. ते न मिळाल्याने १४ जूनपूर्वी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश तपास अधिकाऱ्यांना दिले. संशयितांच्या जामीन अर्जावर पुढील तारखेस सुनावणी होणार आहे. फिर्यादी रोहित ओतारी यांच्या मार्फत ॲड. जयंत बारदेस्कर यांनी, तर सरकार पक्षाच्या वतीने ॲड. वीरा शिंदे यांनी काम पाहिले.फिर्यादीवर दबाव नकोफिर्यादी ओतारी यांनी तपासातील त्रुटींबद्दल न्यायालयात नाराजी व्यक्त केली. याबाबत अर्ज देऊन त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. यावर बोलताना न्यायाधीश बोरकर यांनी पोलिसांकडून तपास अधिकाऱ्यांवर दबाव येऊ नये, अशा सूचना दिल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय