शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कैद्यांना न्यायालयात नेण्याची धावपळ वाचणार, कळंबा कारागृहामधील २५ व्हिडीओ कॉन्फरन्स रूममधून सुनावणी होणार

By सचिन यादव | Updated: April 28, 2025 14:42 IST

सचिन यादव कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात आता कैद्यांना न्यायालयात नेण्यासाठीची धावपळ वाचणार आहे. पोलिस वाहने, सुरक्षा व्यवस्था या ...

सचिन यादवकोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात आता कैद्यांना न्यायालयात नेण्यासाठीची धावपळ वाचणार आहे. पोलिस वाहने, सुरक्षा व्यवस्था या यंत्रणेला विश्रांती मिळणार आहे. कारागृहात त्यासाठी २५ स्वतंत्र व्हिडीओ कॉन्फरन्स रूम तयार होत आहेत. जिल्हा नियोजन मंडळाकडून ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू होत असून येत्या दोन महिन्यांत रूम पूर्ण होतील.न्यायालय आणि कारागृह व्ही.सी. सुविधेने जोडण्यात आली आहेत. यामुळे कैद्यांना आता कोर्टात नेण्या-आणण्याचा त्रास कमी होणार असून, व्ही.सी. द्वारेच कामकाज केले जाणार आहे. यासाठी सत्र न्यायालयामध्ये आणि कारागृहामध्ये व्ही.सी. युनिट निर्माण केली आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी कैद्याला कारागृहातून न्यायालयात ने-आण करण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात. तसेच काही वेळा गैरप्रकारदेखील घडतो.त्यामुळे राज्यातील अन्य कारागृहांप्रमाणेच या ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा सुरू होत आहे. कारागृहाच्या आवारातच त्यासाठी सुमारे दोन हजार चौरस फूट जागेत २५ स्वतंत्र व्ही.सी. रूम तयार होत आहेत.

ई-मुलाखतीला प्रतिसाद

  • कारागृहात कैद्याच्या भेटीसाठी नातेवाइकांची गर्दी कमी करण्यासाठी ई-प्रिझन प्रणाली सुरू आहे. त्याद्वारे नातेवाईक, वकील ऑनलाइन नोंदणी कारागृह एनआयसीच्या मुलाखत पोर्टलवर जाऊन करू शकतात. 
  • नोंदणी केल्यानंतर त्यांना ऑनलाइन भेटीचा दिवस निश्चित केला जात आहे. त्यासाठी नातेवाइकांचा मोबाइल क्रमांक, ओटीपीसह अन्य प्रक्रिया पार पाडावी लागते.
  • यापूर्वी राज्यभरातून कैद्याच्या भेटीसाठी १५० हून अधिक नातेवाइक येत होते. मात्र गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत हे प्रमाण ५० वर आले आहे. या सुविधेने नातेवाइकांचा येण्या-जाण्याचा खर्चही वाचत आहे.

कैद्यांची संख्या

  • कैद्यांची क्षमता १६६५
  • कैदी २०४३
  • महिला कैदी ३४

सुविधेचा फायदाव्हिडीओ कॉन्फरन्स सुविधेमुळे कैद्यांना न्यायालयात हजर होण्याची गरज भासणार नाही. त्यांची आणि कुटुंबाची गैरसोय टाळता येणार आहे. कैदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या वकिलांशी सल्लामसलत करू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रकरणावर चांगली माहिती मिळू शकते आणि ते न्यायालयात योग्यरित्या प्रतिनिधीत्व करू शकतात. त्यासह कुटुंबासोबत संवादही साधू शकतात.

व्हिडीओ कॉन्फरन्स रूमसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे कारागृह प्रशासनाने मागणी केली होती. त्यानुसार ५० लाख रुपये २४ एप्रिलला मंजूर झाले आहेत. त्यांचे कामकाज सुरू होत आहे. - नागनाथ सावंत, वरिष्ठ कारागृह अधीक्षक, कळंबा कारागृह

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrisonतुरुंग