शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्या मुलाने साखरपुड्याचा फोटो डीपीला लावला, अन्..; कोल्हापुरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:30 IST

अल्पवयीन मुलीसोबतच्या साखरपुड्याचा फोटो नवऱ्या मुलाने डीपीला लावला, हे बघताच सुज्ञ व्यक्तीला मुलगी लहान असल्याची शंका आली आणि त्यांनी ही बाब चाईल्ड लाईनला कळविली. त्यानंतर तातडीने पावले उचलत जिल्हा महिला व बालविकास विभागासह पोलिसांनी गुुरुवारी होणारा बालविवाह रोखला.

कोल्हापूर : संभाजीनगर मैलखड्डा येथील अल्पवयीन मुलीसोबतच्या साखरपुड्याचा फोटो नवऱ्या मुलाने डीपीला लावला, हे बघताच सुज्ञ व्यक्तीला मुलगी लहान असल्याची शंका आली आणि त्यांनी ही बाब चाईल्ड लाईनला कळविली. त्यानंतर तातडीने पावले उचलत जिल्हा महिला व बालविकास विभागासह पोलिसांनी गुुरुवारी होणारा बालविवाह रोखला. गेल्याच आठवड्यात नेहरूनगरातील बालविवाह उघडकीस आला होता.संभाजीनगर येथील १५ वर्षे ६ महिने वय असलेल्या मुलीचा ५ एप्रिलला परिसरातील २२ वर्षीय मुलासोबत साखरपुडा झाला होता. मुलाने साखरपुड्यातील हार घातलेला फोटो आपल्या डीपीला लावला हे पाहिल्यानंतर सुज्ञ नागरिकांना मुलगी लहान असल्याचे व बालविवाह झाल्याचे लक्षात आले.त्यांनी ही बाब चाईल्डलाईन संस्थेला कळविली. त्यांनी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी शिल्पा पाटील यांना कळवले. त्यावर तातडीने कार्यवाही करत पोलीस विभागातील पोलीस जमादार रमेश डोईफोडे, संस्थात्मक संरक्षण अधिकारी सुलभा माने, चाईल्ड लाईनच्या तेजस्वी मदने, सुरैय्या मकबुल शिकलगार यांनी घटनास्थळी भेट दिली असता  मुलीने आपला साखरपुडा झाल्याचे सांगितले.यावेळी तिच्यासाबेत लग्न ठरलेल्या मुलालाही बोलावण्यात आले. मुलीचे आधार कार्ड पाहिल्यावर तिची जन्मतारीख सप्टेंबर २००६ असून ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विभागातील अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांनाही बोलावण्यात आले. बालिकेच्या पालकांना व मुलाच्या पालकांना बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे, हे सांगून बालविवाह रोखण्यात आला.

अगतिकता अशीही..मुलीच्या आईने सांगितले की, वडील व्यसनी आहेत. मी कामावर गेल्यावर मुलगी एकटी घरी असते. ती नववीत आहे. पण, शिक्षणाची आवड नसल्याने शाळेत जात नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी