शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाहू मिल स्मारकासाठी लागेल तेवढा निधी सरकार देईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 11:24 IST

शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांचे कार्य एवढे मोठे आहे की त्यांच्याबद्दलचे कोणतेही काम हाती घेतो तेव्हा ५० कोटी १०० कोटी असे निधीचे आकडे जाहीर करायचे नसतात.

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांनी रयतेची काळजी घेत शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार म्हणून दूरदृष्टीने डोंगराएवढे काम केले आहे. शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांचे कार्य एवढे मोठे आहे की त्यांच्याबद्दलचे कोणतेही काम हाती घेतो तेव्हा ५० कोटी १०० कोटी असे निधीचे आकडे जाहीर करायचे नसतात. शाहू मिलमध्ये साकारण्यात येणाऱ्या शाहू स्मारकासाठी लागेल तेवढा निधी राज्य शासन देईल, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे दिला.

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत कोल्हापुरातील शाहू मिलमध्ये आयोजित मुख्य समारंभात त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोल्हापूरकरांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शाहू महाराज हे विकासाची दूरदृष्टी असलेले राजे होते. काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर करताना काही जणांनी टीका टिपण्णी केली की सगळ्या घोषणा जाहीर झाल्या; पण स्मारकांसाठी निधीची घोषणा केली नाही.

खरे तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांच्याबद्दलचे काम हाती घ्याल त्यावेळी आकड्यांतील निधी जाहीर करण्याची गरज नसते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मिलमधील स्मारक झाले पाहिजे असे सांगितले आहे. पण त्यासाठी ५० कोटी १०० कोटी हा निधी जाहीर करून आपण काय साधणार आहोत, त्याचा काही उपयोग होत नाही. पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, शाहू मिल स्मारकाचा आराखडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माझ्यापुढे सादर करणार आहेत. आपण आराखडा सादर करा, स्मारकाचे काम पूर्ण होईपर्यंत जो लागेल तो निधी सरकार देईल.

मुंबईतील स्मारक व सारथीचेही काम लवकरचउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबईत शाहू स्मारक उभारण्यासाठी कार्यवाही केली जाईल. सारथी संस्थेद्वारे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. संस्थेच्या कोल्हापूर येथील कार्यालयासाठी व वसतिगृहासाठी शासनाने पाच एकर जागा दिली आहे. ती साइट आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी पाहिली असून, चांगला प्लॅन तयार केला आहे. हे कामदेखील लवकरच सुरू केले जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीAjit Pawarअजित पवार