शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी.!, अपघाताने हिरावले बालिकेचे मातृछत्र; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 17:49 IST

आई-आई म्हणून तिचा जप सुरूच होता. माझी आई कुठेय? या तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे धाडस कुणातच नव्हते.

उद्धव गोडसेकोल्हापूर : आपल्या डोळ्यांसमोरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आपली आई वाचवा- वाचवा म्हणून आकांत करतेय, अशी कल्पना जरी केली तरी हृदयात कालवाकालव होते. अजाणत्या वयात आईचं छत्र हरवलं तर जगण्याचा सूरच बिघडतो. नेमकं असंच झालंय उजळाईवाडीतील (ता. करवीर) इशिताच्या बाबतीत. अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीची आई अपघाताने हिरावून घेतली आणि आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी... असं म्हणण्याची वेळ निष्पाप इशितावर आली.रविवारचा दिवस आणि संकष्टी चतुर्थीचा योग म्हटल्यावर उजळाईवाडीतील (दादू चौगुलेनगर) शीतल सतीश कवडे आणि वैजयंता अशोक पाटील यांनी कोल्हापुरात ओढ्यावरील गणपतीच्या दर्शनासाठी जाण्याचा बेत ठरवला. चार वर्षांची मुलगी इशिताला घेऊन या दोघी दुचाकीवरून बाहेर पडल्या. शहरात जातोयच तर नातेवाईकांनाही भेटून घेऊ, असे म्हणत टेंबे रोडवर पाटील काकूंच्या बहिणीच्या घरी गेल्या. पाहूणचार झाला. गप्पा- टप्पा झाल्या. त्यानंतर देशदर्शन आटोपून घरी परतताना घात झाला. शिवाजी विद्यापीठ चौकात भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली आणि या अपघातात इशिताची आई गंभीर जखमी झाली.नशिब बलवत्तर म्हणून इशिता आणि पाटील काकू बचावल्या; पण या अपघातातून इशिताच्या डोक्यावरील मातृछत्र परमेश्वराने हिरावून घेतले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आपली आई चिमुरड्या इशितानं पाहिली. रुग्णवाहिकेतून तिला सीपीआरमध्ये पाठवतानाही आईसोबतच बसण्याचा इशिताचा हट्ट थांबला नाही. सीपीआरमध्ये पोहोचल्यावर घाबरलेल्या इशिताचे डोळे लुकलुकत होते.

स्वत:च्या नाकावर झालेली जखम, दातातून आलेलं रक्त याचं काहीच भान तिला नव्हतं. तिला फक्त आई हवी होती. तिची नजर फक्त आईचा शोध घेत होती. काही वेळातच तिचे बाबा सीपीआरमध्ये पोहोचले; पण पत्नीची गंभीर अवस्था अन् कावरीबावरी झालेली इशिता पाहून त्यांना अधिकच गलबलून आलं. नि:शब्द झालेली बाबाची अवस्थाच सारं काही सांगून जात होती. काही वेळाने जखमी शीतल कवडे गेल्याचे समजले आणि सगळ्यांच्याच नजरा इशितावर पडल्या. आई समजून घेण्याआधीच गेलेली आई शोधण्याचा चिमुरडीचा प्रयत्न मात्र सुरूच होता...कल्पनेपलिकडचे दु:खजखमी आईवर उपचार सुरू असताना काही नातेवाईक इशिताची समजूत घालत होते. खरे तर त्यांनाही समजुतीचे शब्द सूचत नव्हते. आई- आई म्हणून तिचा जप सुरूच होता. माझी आई कुठेय? या तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे धाडस कुणातच नव्हते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू