शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Maratha Reservation: सर्वेक्षण केलेल्या प्रगणकांना येत्या आठ दिवसांत मानधन मिळणार, कोल्हापूर जिल्ह्याला ४ कोटी ३ लाखांचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 13:56 IST

सर्वेक्षण केलेले प्रगणक व पर्यवेक्षक गेल्या सहा महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत होते

शितल सदाशिव मोरे आजरा : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने राज्यातील मराठा व मागास कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण करणारे प्रगणक व पर्यवेक्षक यांना गेले सहा महिने मानधन मिळाले नव्हते. जिल्ह्यातील प्रगणक व पर्यवेक्षक यांचे मानधन देण्यासाठी ४ कोटी ३ लाखांचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे. जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसील कार्यालयांकडे मानधनाचा धनादेश पाठविला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात सर्वेक्षण केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार आहे.मराठा व मागास कुटुंबांच्या सर्वेक्षणानंतर राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, सध्या त्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. कुटुंबांचे सर्वेक्षण केलेले प्रगणक व पर्यवेक्षक गेल्या सहा महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत होते. अखेर मानधन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला निधी प्राप्त झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून हा निधी तालुका स्तरावरही पाठविण्यात आला आहे.मराठा व खुल्या प्रवर्गातील शंभर कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणकास १० हजार रुपये, तर मागासवर्ग कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाप्रमाणे प्रगणकास रु. १०, तर प्रगणक प्रशिक्षणाकरिता प्रवास भत्ता रुपये ५०० प्रमाणे दिला आहे. पर्यवेक्षकांना १० हजार ५०० प्रमाणे मानधन दिले जाणार आहे. मानधनाची रक्कम प्रगणक व पर्यवेक्षकांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय मराठा कुटुंबांची संख्या

  • करवीर - ५२,४८३
  • गगनबावडा - ५,१७२
  • हातकणंगले - ४८,३६९
  • शिरोळ - ३८,५९३
  • आजरा - १९,४४९
  • भुदरगड - २२,६५३
  • राधानगरी - २५,५१९
  • कागल - ३७,६०९
  • गडहिंग्लज - २९,३७४
  • चंदगड - २८६५३
  • पन्हाळा - ३०,१२९
  • शाहूवाडी - १९,१६९
  • एकूण - ३,५७,१६२

प्रगणकांना प्रवास भत्त्यासह मिळणारी रक्कम

  • करवीर - ५९ लाख ५८ हजार
  • गगनबावडा - ५ लाख ९१ हजार
  • हातकणंगले - ५५ लाख ९६ हजार
  • शिरोळ - ४४ लाख ९८ हजार
  • आजरा - २१ लाख ६७ हजार
  • भुदरगड - २५ लाख ६३ हजार
  • राधानगरी - २८ लाख ३४ हजार
  • कागल - ४२ लाख ३२ हजार
  • गडहिंग्लज - ३२ लाख ३६ हजार
  • चंदगड - ३१ लाख ५३ हजार
  • पन्हाळा - ३३ लाख १८ हजार.
  • शाहूवाडी - २१ लाख ४९ हजार

जिल्ह्यातील एकूण प्रगणक - ५,६७७.जिल्ह्यातील मागासवर्गीय कुटुंबांची संख्या - १,७४,६३७.जिल्ह्यातील मराठा कुटुंबाची संख्या - ३,५७,१६२.जिल्ह्यातील एकूण कुटुंबांची संख्या - ५,३१,७९९.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण