शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

Kolhapur: प्रकाश आवाडेंच्या भाजप प्रवेशाने इचलकरंजीत एकास एक लढत?, कार्यकर्त्यांत मनोमिलनाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:35 IST

हाळवणकर यांच्या मेळाव्याकडे लक्ष

अतुल आंबीइचलकरंजी : आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ताराराणी पक्षात उत्साह, तर भाजपमध्ये अस्वस्थता असे वातावरण असून दोन्हीकडील कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान नेत्यांसमोर आहे. दरम्यान, आवाडे यांच्या भाजप प्रवेशाने इचलकरंजी मतदारसंघात एकास एक लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.आवाडे यांच्या भाजप प्रवेशाने शहरातील महायुतीसह महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आवाडे यांच्या नेहमी विरोधात असणारे अनेकजण महायुतीमध्ये कार्यरत होते. आवाडे यांनी राजकीय खेळी करत तेथे उडी घेतल्याने त्यांची गोची झाली असून, त्यांची पुढील भूमिका कशी राहणार, याकडेही लक्ष लागले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्येही खलबत्ते सुरू असून, आवाडे यांना टक्कर देण्यासाठी एकत्रित येऊन एकास एक उमेदवारीची समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात महायुतीमधील परंपरागत कट्टर आवाडे विरोधक सोबत येऊन अथवा अंतर्गत आपणास मदत करतील का, यासाठीही चाचपणी सुरू आहे.

शहरात आवाडे यांना विरोध करण्यासाठी अनेकवेळा विरोधकांनी एकत्र येत एकास एक उमेदवार देऊन आवाडे यांना आव्हान उभे केले आहे. अशा एकास एक लढतीत आवाडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. हा इतिहास पाहता यंदाही तसा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यात आमदार आवाडे यांनी स्वत: बाजूला राहत पुत्र राहुल यांना उमेदवारी घोषित केल्याने विरोधकांनी तीन पिढ्या एका घरात आमदारकी द्यायची काय, असे म्हणत रान उठविण्यास सुरूवात केली आहे.

बेरजेची राजकीय खेळीआवाडे यांनी बेरजेची राजकीय खेळी करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या गटाची स्वत:ची मते त्यामध्ये भाजप म्हणून मिळणारी पक्षाची मते तसेच मोदीप्रेमी व हिंदुत्ववादी मते आवाडे यांना मिळतील, असे त्यांचे गणित आहे.

हाळवणकर यांच्या मेळाव्याकडे लक्षसध्या पक्षादेश असल्याने सुरेश हाळवणकर यांना वेगळी भूमिका घेणे अडचणीचे आहे. मात्र, त्यांच्यासोबत कोणतीही अपेक्षा न बाळगता निष्ठावंत म्हणून राहिलेल्या कार्यकर्त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पितृपक्षानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन हाळवणकर त्यांची भावना जाणून घेणार आहेत. त्यामध्ये होणाऱ्या निर्णयाकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कार्यकर्त्यांची मानसिकतावर्षानुवर्षे आवाडे विरोधक म्हणून कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची आवाडे यांचा प्रचार करण्याची मानसिकता दिसत नाही. मुळात हाळवणकर यांनीही पत्रकारांशी बोलताना आवडे यांना वैचारिक विरोध राहणारच, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाचे पालन म्हणून ते कितपत सक्रिय राहतात आणि आवाडे यांच्याशी कसे जुळवून घेतात, त्यावरही कार्यकर्त्यांचा कल अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीPoliticsराजकारणBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाPrakash Awadeप्रकाश आवाडेSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकर