शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
2
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
3
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
4
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
5
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
6
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
7
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
8
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
9
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
10
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
11
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
12
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
13
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
14
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
15
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
16
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
17
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
18
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
19
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
20
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजी महापालिका निवडणुकीत सर्वच प्रभागांत चुरस, 'या'ठिकाणी महायुतीतच कुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:39 IST

'या' प्रभाग महायुतीतच कुस्ती

इचलकरंजी : येथील महापालिकेच्या निवडणुकीसाठी जवळपास सर्वच प्रभागांत चुरस असून, आपल्या प्रभागात घटक पक्षांतील प्रतिस्पर्धी किंवा बेरजेच्या राजकारणात अडथळा ठरणारा अपक्ष यांना माघार घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत खलबत्ते सुरू होते. माघारीसाठी आज, शुक्रवारचे चार तासच शिल्लक आहेत. उमेदवारांसह पक्षश्रेष्ठी आणि भागातील जाणकार मध्यस्थ यांच्यामार्फत या तडजोडीच्या बैठका सुरू आहेत. त्यामध्ये कोणाला यश आले, हे माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.शहरातील बहुतांश प्रभागांत रंगतदार लढती होणार आहेत. त्यातील काही प्रभागांत भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी यांचे उमेदवार पक्षाच्या अधिकृत चिन्हावर मैत्रीपूर्ण म्हणून उभारले आहेत. प्रामुख्याने त्यातील शक्य त्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी मनधरणी आणि तडजोडीचे राजकारण सुरू आहे. दिवसभर चर्चेच्या अनेक फेºया झाल्या. परंतु त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पुन्हा खलबत्ते सुरूच होते.काही प्रभागांत मैत्रीपूर्णमध्ये प्रबळ उमेदवार असल्यामुळे तेथे महायुतीच्या उमेदवाराला अडचण होऊ शकते. त्या ठिकाणांच्या उमेदवारांना माघारीसाठी पक्षश्रेष्ठींमार्फत जोडण्या लावण्याचे काम सुरू आहे. तडजोडी न झाल्यास मैत्रीपूर्ण लढतींचे नाव दिले असले तरी तेथे काटे की टक्कर होणार आहे. महायुतीच्या बेरजेच्या गणितानुसार या मैत्रीपूर्ण कुस्तीतून जो उमेदवार विजयी होईल, तो महायुतीचा, अशी भूमिका दिसत आहे. याला कोणकोणत्या प्रभागांत खो बसेल, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

प्रभाग क्रमांक १५ मध्ये महायुतीतच कुस्तीप्रभाग क्रमांक १५ मध्ये महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना यांच्यात चांगलीच कुस्ती लागली आहे. माघारी आणि तडजोडीसाठीचे प्रयत्न बाजूलाच राहिले असून, शिंदेसेनेने अंजली मदन जाधव या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले. त्यामुळे प्रभागातील चारही उमेदवारांचे पॅनेल शिंदेसेना म्हणून लढणार आहे. त्याचबरोबर या प्रभागात भाजपचे ४, शिव-शाहू आघाडीचे ४ आणि अपक्ष यांच्यात बहुरंगी लढत होणार आहे.

दोन ठिकाणी बिनविरोधसाठी प्रयत्नप्रतिस्पर्धी उमेदवारांना माघार घेण्यासाठी तयार करून आपली बिनविरोध निवड व्हावी, यासाठी शहरातील जवाहरनगर, विक्रमनगर आणि गावभाग या परिसरातील दोन प्रभागांत प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच्या तडजोडी मध्यस्थांमार्फत रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. याबाबतची चर्चा शहरात रंगली होती. प्रत्यक्षात माघारीनंतरच त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Municipal Election 2026: Intense competition, alliances face internal strife.

Web Summary : Ichalkaranji faces intense municipal election competition across wards. Factions negotiate withdrawals, especially where alliances clash. Ward 15 sees BJP vs. Shiv Sena contest. Efforts are underway for unopposed selections in two wards.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६