शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात ४० लाख लोकसंख्येतून २३ हजार असाक्षर शोधण्याचे शिक्षण विभागासमोर 'टार्गेट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:51 IST

असाक्षरांची वर्षातून दोनवेळा परीक्षा

कोल्हापूर : देशातील एकही व्यक्ती असाक्षर राहता कामा नये, यासाठी केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. २०३० पर्यंत सर्व तरुण, प्रौढ स्त्री-पुरुषांना साक्षर बनविण्यासाठी केंद्राने प्रयत्न सुरू केली असून, कोल्हापूर जिल्ह्यात नवभारत साक्षरता अभियान जोरदारपणे राबवले जात आहे. त्याअंतर्गत येत्या वर्षात २३ हजार १२६ असाक्षर शोधून काढण्याचे टार्गेट शिक्षण योजना विभागाला दिले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्याची ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असून यातील २३ हजार असाक्षर शोधण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. या नवसाक्षरांसाठी वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाते. येत्या सप्टेंबरमध्ये ही परीक्षा होणार असून, यासाठी नोंदणी सुरू आहे.

निरंतर शिक्षणाकडून उच्च शिक्षणाकडे वाटचालया अभियानाचा उद्देश देश ९५ टक्के साक्षर करणे हा आहे. नव साक्षर लोकांना वाचणे, लिहिणे याच बरोबर गणित, बँकेचे व्यवहार येणे आवश्यक आहे. देशातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.

असाक्षरांची वर्षातून दोनवेळा परीक्षासर्व्हेतून शोधलेल्या असाक्षरांची वर्षातून दोनवेळा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे त्यांच्यातील मूल्यमापन होते. लाभार्थी आणि स्वयंसेवी शिक्षक यांचे सर्वेक्षण शाळांकडून केले जाते. ज्या शालेय विद्यार्थ्यांच्या कुटुंबामध्ये निरक्षर व्यक्ती नाहीत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शेजारचे निरक्षरांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. शासकीय/अनुदानित/खासगी शाळांमधील शिक्षकांव्यतिरिक्त शिक्षक पदाचे शिक्षण घेणारे, उच्च शिक्षण संस्थामधील विद्यार्थी, पंचायतराज संस्था, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांचाही स्वयंसेवक म्हणून सहभाग आहे.

केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून असाक्षरांचा सर्व्हे केला जात आहे. जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचा प्रयत्न आहे. - एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी योजना, कोल्हापूर