शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार घुसली खासगी रुग्णालयात, चालक ठार; कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 17:11 IST

रात्रीच्यावेळी शांत वातावरणात जोराचा आवाज आल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर आले. या दुर्घटनेत चालक दड्डीकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

कोल्हापूर : भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याकडेच्या फुटपाथवरून थेट खासगी हॉस्पिटलची सुरक्षा भिंत पाडून शेडमध्ये घुसली. आज, गुरुवारी पहाटे घडलेल्या या दुर्घटनेत कारचालक ठार झाला. अमित रमेश दड्डीकर (वय ३८, रा. विश्वकर्मा हाैसिंग सोसायटी, जवाहरनगर) असे ठार झालेल्याचे नाव आहे. या दुर्घटनेत मोटारकारसह हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दोन दुचाकींचेही मोठे नुकसान झाले.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमित दड्डीकर हे सराफ व्यावसायिक असून, त्यांचे दैवज्ञ बोर्डिंगनजीक सराफाचे दुकान आहे. बुधवारी रात्री ते आपल्या कारमधून कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर ते पहाटेच्या सुमारास ध्यानचंद हॉकी स्टेडियमकडून रिंगरोडमार्गे जवाहरनगरकडे घरी परतत होते.यावेळी त्यांचा धावत्या मोटारीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याकडेच्या फुटपाथवरुन सिद्धांत हॉस्पिटलबाहेरील पार्क केलेल्या दुचाकी उडवत सुरक्षा भिंतीला धडकून शेजारील ऑक्सिजन शेडमध्ये घुसली. या अपघातात हॉस्पिटलची भिंत पडली, यामुळे मोठे नुकसान झाले.रात्रीच्यावेळी शांत वातावरणात जोराचा आवाज आल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर आले. या दुर्घटनेत चालक दड्डीकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अमित यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, दोन बहिणी, आत्या असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात