शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘मिसळ’पे चर्चा पोहोचली थेट जेवणाच्या ताटापर्यंत; प्रचार टिपेला, घडामोडींना ऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 09:15 IST

मतदारांना बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कोल्हापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती व महायुतीचे संजय मंडलिक यांच्यात सरळ लढत होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ लोकसभा मतदारसंघात प्रचार टिपेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गाव टू गाव पिंजून काढला आहे. मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी स्थानिक पातळीवर स्वतंत्र यंत्रणा तयार असून, सुरुवातीच्या टप्प्यात सुरू असलेली ‘मिसळ पे चर्चा’ आता थेट जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचली आहे.

कोल्हापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती व महायुतीचे संजय मंडलिक यांच्यात सरळ लढत होत आहे. आघाडीच्या उमेदवारांनी सुरुवातीच्या टप्प्यात काेल्हापूर शहरासह उपनगर व तालुक्याच्या ठिकाणी मिसळ पे चर्चेचे आयोजन करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. महायुतीकडूनही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक ठिकाणी मिसळ पे चर्चा आयोजित केली गेली. हातकणंगलेच्या तुलनेत कोल्हापूर मतदारसंघात मिसळ पे चर्चा जरा जादाच रंगली होती.

आता प्रचार अंतिम टप्प्यात आहे. रविवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून जेवणावळी वाढल्या आहेत. मतदानासाठी दोनच दिवस राहिल्याने जेवणासह मतदारांना खूश करण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा सक्रिय झाली आहे. सोमवारी छुपा प्रचार राहणार असून, या दिवसात घडामोडींना ऊत येणार आहे.

हॉटेल, धाबे बुक....उमेदवारांची यंत्रणा प्रत्येक तालुक्यात पोहोचणार नाही, त्यामुळे स्थानिक नेत्यांकडेच सगळी जबाबदारी दिली आहे. त्यांनी हॉटेल, धाबे बुक केले आहेत. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जेवणावळीचे पास संबंधितांकडे पोहोचविले जातात.

...वाढदिवसाच्या आडून पंगती उठू लागल्याउमेदवारांच्या सगळ्या हालचालींवर निवडणूक विभागाचे बारीक लक्ष असते. सभा, वाहनांसह इतर खर्चाची नोंद केली जाते. त्यामुळे निवडणूक विभागाच्या नजरेतून वाचण्यासाठी अनेक क्लृप्त्या केल्या जात आहेत. मंगल कार्यालयाबाहेर एखाद्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाचे डिजिटल फलक लावायचे आणि तिथेच पंगती उठवायच्या असे प्रकार सुरू आहेत.

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरcongressकाँग्रेसBJPभाजपा