शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

राजर्षींचा ‘बेनजर व्हिला’ लढतोय अस्तित्वासाठी, पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष; नावाचा झाला अपभ्रंश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 11:57 IST

एकीकडे सरकार पर्यटनाच्या नावाखाली इव्हेंट करून कोट्यवधी रुपयांची उधळण करत असताना दुसरीकडे अशा अप्रतिम वास्तूंकडे मात्र साेयीस्कर दुर्लक्ष

आदित्य वेल्हाळ कोल्हापूर : कोल्हापूरची जीवनदायिनी ठरलेल्या राधानगरीधरणातील शाहू महाराजांची आवडती वास्तू असणाऱ्या बेनजर व्हिलाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून पुरातत्त्व विभागाच्या बेदखलपणामुळे ही वास्तू अस्तित्वासाठी लढत आहे. सहजासहजी न दिसणारे, दृष्टी एका जागी राहू न शकणारे अप्रतिम सौंदर्य म्हणजे ‘बेनजर,’ या अर्थाने शाहू महाराजांनी या वास्तूला ‘बेनजर व्हिला’ हे नाव दिले. १९१२ साली शाहू महाराजांनी केलेल्या एका ठरावात या नावाचा उल्लेख आहे. कोल्हापुरातील पुराभिलेख कार्यालयात हा ठराव उपलब्ध आहे. मात्र, अपभ्रंश होऊन ‘बेनझीर’ हे नाव प्रचलित झाले. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी शाहूप्रेमींनी गेल्या पाच वर्षांपासून लावून धरली आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाला शाहू महाराजांच्या या ऐतिहासिक वास्तूबद्दल ममत्वच नसल्याने ही वास्तू काळाच्या उदरात लोप पावत आहे.दसऱ्याच्या मुहूर्तावर १९०८ साली शाहू महाराजांनी राधानगरीधरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. हे काम महाराजांच्या हयातीत पूर्ण झाले नाही; मात्र छत्रपती राजाराम महाराजांनी धरणाचे काम पूर्ण केले. धरणाच्या परिसराची नैसर्गिक संपन्नता व धरणाच्या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी धरणाच्या हद्दीत टेकडीवर हा बंगला बांधला. पाणीसाठा वाढल्यामुळे बेनजर व्हिला बॅकवॉटरच्या मधोमध आला आहे.एकीकडे सरकार पर्यटनाच्या नावाखाली इव्हेंट करून कोट्यवधी रुपयांची उधळण करत असताना दुसरीकडे अशा अप्रतिम वास्तूंकडे मात्र साेयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. आता ही वास्तू जतन करण्यासाठी शाहूप्रेमींनी पुढे येण्याची गरज आहे.

भिंतीचे दगड निखळलेबेनजर व्हिला १९७५, २०१६, २०१९ व आत्ता २०२३ ला चौथ्यांदा पाणीसाठा कमी झाल्यामुळे खुला झाला. हा बंगला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. चहूबाजूंनी कायम पाणी असल्याने दुर्लक्षित राहिलेली ही वास्तू आत्ता फारच दयनीय अवस्थेत आहे. पाऊस, वाऱ्याचा मारा, दगडी भिंतींवर झाडांची मुळे व पारंब्या पसरल्यामुळे भिंतीचे दगड निखळू लागले आहेत. आणखी काही वर्षांत ही वास्तू ढासळण्याचा धोका आहे.

लक्ष्मी तलावाच्या हद्दीतील बेनजर व्हिलासाठी लागणारी सागवानाची लाकडे पुंगाव (ता. राधानगरी) हद्दीतील जंगलातून घ्यावीत, असा ठराव शाहू महाराजांनी १९१२ साली केला होता. या ठरावातील कागदपत्रांवर ‘बेनजर व्हिला’ असा उल्लेख आहे. - गणेश खोडके, अभिलेखाधिकारी, पुराभिलेख कार्यालय, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीDamधरणShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती