शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Kolhapur Crime: बनावट इन्स्टा अकाउंटद्वारे तरुणीची बदनामी, अश्लील मेसेज केले व्हायरल; संशयिताचा शोध सुरू

By उद्धव गोडसे | Updated: March 15, 2023 12:50 IST

आपले खासगी आयुष्य जगजाहीर करताना काळजी घेण्याची गरज

कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील एका तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून अश्लील मेसेज व्हायरल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या पालकांनी मंगळवारी (दि. १४) करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू आहे.पाचगाव येथील एका तरुणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील काही फोटो घेऊन अज्ञाताने तिच्या नावाने बारा बनावट इन्स्टा अकाउंट तयार केली. त्यावर तरुणीचे मॉर्फ केलेले फोटो आणि अश्लील मेसेज पाठवले जात आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये पहिले बनावट अकाउंट लक्षात येताच संबंधित तरुणीच्या पालकांनी करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार अर्ज दिला. तसेच तरुणीने तिचे फेसबूक आणि इन्स्टा अकाउंट बंद केले. गेल्या सहा महिन्यांपासून सोशल मीडियात तिचे एकही अकाउंट नसताना गेल्या १५ ते २० दिवसांपासून अज्ञात व्यक्तीने तिच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाती तयार करून अश्लील मेसेज व्हायरल केल्याचे लक्षात आले.याबाबत पीडित तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सायबर पोलिसांच्या सल्ल्यानुसार पीडित तरुणीच्या पालकांनी मंगळवारी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद काळे यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधून बनावट अकाउंट तयार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याबद्दल चर्चा केली. लवकरच यातील संशयिताला पकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती निरीक्षक काळे यांनी दिली.

जाणीवपूर्वक बदनामी..बनावट इन्स्टा अकाउंटवर पीडित मुलीचे फोटो इतर तरुणांसोबत एडिट करून शेअर केले आहेत. अश्लील भाषेत मजकूर लिहून चारित्र्यहनन केले आहे. तरुणीचे मित्र आणि नातेवाईकांनाही आक्षेपार्ह मेसेज पाठवले आहेत. त्यामुळे कुणीतरी जाणीवपूर्वक बदनामीचा प्रकार केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

उठसूठ फोटो शेअर करू नका..हल्ली तरुण मुली हॉटेलमध्ये चहा प्यायला गेल्या तरी तिथे फोटो काढून लगेच स्टेटसला लावतात. फेसबूकपासून अनेक प्लॅटफाॅर्मवर शेअर करतात. तसे करणे धोक्याचे आहे. त्याचा कोणत्याही कारणांसाठी गैरवापर होतो. त्यामुळे असे आपले खासगी आयुष्य जगजाहीर करताना काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस