शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दोन लेकरांच्या मृत्यूच्या धसक्याने आईचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 16:08 IST

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे येथील सुहास व स्वप्निल यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा मानसिक धक्का ...

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे येथील सुहास व स्वप्निल यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने आई नंदाताई कृष्णा पाटील (वय ५६) यांचा शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. हे वृत्त समजताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला.कोपार्डे गावातील सख्खे भाऊ सुहास व स्वप्निल पाटील यांचा बुधवार दि. ३ जुलै रोजी शेतात तणनाशके फवारताना महावितरण कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या तारेस स्पर्श होऊन मृत्यू झाला होता. दोन्ही कमावती मुले काळाने हिरावून घेतली. म्हातारपणी आधार देणारे आधारच नाहीसे झाले. त्या माऊलीची मुले गेल्यापासून डोळ्याचे पाणी हटत नव्हते. घरी भेटायला येणारे पै-पाहुणे,नातेवाईक व ग्रामस्थ त्या माऊलीची अवस्था पाहून थिजून जात. अवघ्या तीन दिवसांनी शनिवारी दि.६ जुलै रोजी मध्यरात्री मुलांच्या विरहाने आई नंदाताई पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshahuwadi-acशाहूवाडीDeathमृत्यू