शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: जोतिबा ते कुशिरे न थांबता धावणाऱ्या संतोषला काळाची धाव कळलीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:43 IST

दाम्पत्याच्या अपघाती मृत्यूने कसबा बावडा हळहळला

रमेश पाटीलकसबा बावडा : प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत जिद्दीने यश मिळविणारा, पट्टीचा पोहणारा, धावणारा सामाजिक कार्यकर्ता संतोष गायकवाड मंगळवारी काळाच्या गतीपुढे मात्र हरला. कवठेमहांकाळ तालुक्यात शिरढोणजवळ झालेल्या अपघातात पत्नीसह त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच सारा बावडा हळहळला.संतोष धोंडिराम गायकवाड (वय ४९) व त्यांची पत्नी ॲड. वंदना गायकवाड (४७, रा. बिबट्या बोळ, कसबा बावडा), या दाम्पत्याचा मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर कारने ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दहावीची परीक्षा दिलेला मुलगा व इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत असलेली मुलगी, आई बहीण व भाऊ असा परिवार आहे.संतोष गायकवाड यांनी सुरुवातीच्या काळात पेप्सी विकून आपल्या कुटुंबाचा जम बसवला. लहान-मोठे व्यवसाय केले. एलआयसी एजंट म्हणून त्यांनी काम केले. सध्या ते सोलार पॅनल बसवण्याचे काम करत होते. लग्नानंतर त्यांनी पत्नीला वकील केले. मंगळवारी ते पत्नीसह आपल्या गाडीतून पंढरपूरकडे चालले होते. त्यावेळी हा अपघात झाला.संतोष गायकवाड येथील राजाराम बंधारा ग्रुपचे सदस्य आहेत. दररोज न चुकता ते बंधाऱ्यावर पोहायला जात. त्यानंतर शक्य होईल तेवढी बंधारा परिसराची स्वच्छता करणे हे त्यांचे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांचे ठरलेलं काम असे. दर रविवारी न चुकता जोतिबाला कुशिरे गावातून पळत जायचे आणि परत पळत यायचे हा त्यांचा छंद होता. योगासन, नेहमी व्यायाम करणारे, समाजकार्यात हिरीरीने भाग घेणारा असा जिवलग मित्र गेल्याने नातेवाईकांसह त्यांच्या मित्रपरिवाराला धक्का बसला.दर रविवारी जोतिबा दर्शनजोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कुशिरे गावातून ‘ते’ दर रविवारी न थांबता पळत सुटायचे आणि जोतिबावर पोहोचल्यावरच थांबायचे. जोतिबाचे दर्शन घेऊन एक मंदिराभोवती फेरी मारून परत पळत सुटायचे तो कुशिरे गावात येऊन थांबायचे.

पुरात मुख्य धारेवर घ्यायचे उडीपंचगंगेला जेव्हा पूर येतो तेव्हा त्या पुरात मुख्य धारेवर उडी मारायची आणि अवघ्या वीस मिनिटांत राजाराम बंधारा घाटावर पोहोचायचे. राजाराम बंधाऱ्यावरून नदीत उडी घेतली की, नदीपात्रातील महादेवाच्या मंदिराला टच करून न दमता ते परत यायचे. असा त्यांचा दिनक्रम; परंतु त्यांचा हा दिनक्रम आता कायमचा बंद झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Untimely Death: Santosh, Who Ran Tirelessly, Succumbed to Fate.

Web Summary : Social worker Santosh Gaikwad and his wife tragically died in an accident near Shirdhon. Known for his swimming, running, and community service, Santosh regularly ran to Jotiba temple and swam in flooded rivers. His sudden demise has shocked Kasba Bawda.