शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा स्वामींचा अवतार; घरात दरबार थाटणाऱ्या पालकांवर गुन्हा; कोल्हापुरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 11:33 IST

अल्पवयीन मुलाचा गैरवापर केल्याची तक्रार

कोल्हापूर : पंधरा वर्षीय मुलगा स्वामी समर्थांचा अवतार असल्याचे भासवून घरात दरबार थाटणाऱ्या पालकांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी (दि. २६) जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. हा प्रकार कसबा बावडा येथील कदमवाडी रोडवरील राम चौगुले कॉलनीत गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. याबाबत मुलाचे पालक इंद्रायणी हितेश वलादे (वय ३६) आणि हितेश लक्ष्मण वलादे (वय ३७, दोघे मूळ रा. कॅम्प एरिया, गडचिरोली, सध्या रा. कदमवाडी रोड, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे गडचिरोली येथील वलादे दाम्पत्य किरण पालकर यांच्या घरी भाड्याने राहते. आपला १५ वर्षीय मुलगा स्वामींचा अवतार असून, त्याच्या अंगात दैवी शक्ती असल्याचे ते लोकांना सांगत होते. कुलदैवताची पूजा करा, स्वामींच्या नावाने प्रसाद करा आणि पाच गुरुवार दर्शनासाठी या, असे ते लोकांना सांगत होते. यातून त्यांनी घरातच दरबार थाटला होता. श्री बालस्वामी समर्थ भक्त मंडळाचीही स्थापना केली आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पारायणाचा मंगळवारी अखेरचा दिवस होता.दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही कार्यकर्त्यांनी याबाबत शाहूपुरी पोलिसांना माहिती देऊन अंधश्रद्धा वाढवण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वलादे यांच्या घरी जाऊन माहिती घेतली असता दरबाराची वस्तुस्थिती समोर आली. अल्पवयीन मुलाचा गैरवापर करून अंधश्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी बालस्वामीच्या पालकांवर गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक प्रणाली पवार अधिक तपास करीत आहेत.

बालस्वामीस शारीरिक व्यंगवलादे दाम्पत्याचा मुलगा १५ वर्षांचा असला तरी त्याच्या शरीराची योग्य वाढ झाली नसल्याने तो आठ ते दहा वर्षांचा असल्याचे दिसते. त्याच्या शारीरिक व्यंगाचा गैरवापर करून दरबार थाटला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दहा हजार लोकांचा महाप्रसाददत्त जयंतीनिमित्त बालस्वामी भक्त मंडळाने दहा हजार लोकांसाठी महाप्रसाद तयार केला होता. रात्री महाप्रसादासाठी भाविकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. गर्दी नियंत्रित करण्यासाठी भक्त मंडळाच्या स्वयंसेवकांसह खासगी सुरक्षा रक्षकही तैनात केले होते.

या गैरकृत्यात मुलाचे आई-वडील सामील आहेत. हे मानवी हक्काबरोबर बालहक्काचे उल्लंघन आहे. यासाठी गरज पडल्यास बालहक्क आयोगाकडे दाद मागितली पाहिजे. त्याआधी स्थानिक पोलिसांनी बालस्वामीचे प्रकरण थांबवावे. कोणाचा तरी अवतार असल्याचा दावा करून लोकांची दिशाभूल करणे हा गुन्हा आहे. - मुक्ता दाभोळकर, अंनिसच्या कार्यकर्त्या

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस