शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लोककल्याणकारी प्रकल्पांचे श्रेय एकट्या शिंदेंचं नाही, सर्वेक्षणातील निष्कर्षावर मुख्यमंत्र्यांची सारवासारव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 13:40 IST

डबल इंजिन सरकारने विकासाचे ब्रेक काढले, स्पीडब्रेकरचे अडथळे तोडले

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आम्हा दोघांना अव्वल स्थान मिळाले आहे. हे श्रेय एकट्या एकनाथ शिंदे यांचे नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आहे, अशी सारवासारव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील सभेत बोलताना केली.‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी झाला. त्यानिमित्ताने तपोवन मैदानावर सभेचेही आयोजन करण्यात आले. सभेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. परंतु त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यांच्या न येण्यामुळे सभेच्या ठिकाणी उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सभेत सारवासारव केली.मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही गेल्या अकरा महिन्यात अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. केंद्र सरकारचे सहकार्य त्यास मिळाले. या योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळवून दिला. त्यामुळे नरेद्र मोदी व मला अव्वल स्थान मिळाले. परंतु हे श्रेय एकट्या शिंदे यांचे नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आहे. कारण या सर्वांनी वेगवान निर्णय घेतले. त्याची अमंलबजावणी करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे.भाजप-शिवसेनेचे राज्य होते तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीत राज्याला नंबर वन वर नेऊन ठेवले होते. परंतु ‘मविआ’ सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यातील विकासाला ब्रेक लागला. अनेक स्पीडब्रेकर निर्माण केले. त्यामुळे राज्यात परकीय गुंतवणूक थांबली. अन्य राज्ये पुढे गेली. पण आपले राज्य मागे पडले. परंतु आम्ही अकरा महिन्यात राज्यात एक लाख १४ हजार कोटींची परकीय गुंतवणूक आणून पुन्हा एकदा राज्याला नंबर वन वर नेऊन ठेवले आहे. डबल इंजिन सरकारने विकासाचे ब्रेक काढले, स्पीडब्रेकरचे अडथळे तोडले, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमच्या सरकारने सर्वसामान्यांच्या हितापेक्षा दुसरा कोणताही निर्णय घेतला नाही. मविआ सरकारने अडीच वर्षांत सिंचनाचा एकही प्रकल्प मंजूर केला नाही. मात्र आमच्या सरकारने अकरा महिन्यात सिंचनाचे २९ प्रकल्प मंजूर केले. त्यामुळे आठ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यावेळी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भाषणे झाली.विरोधी पक्षाच्या आमदारांची पाठ हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीच मुख्यत: सारे प्रयत्न केले परंतु भाजपचे नेते व कार्यकर्तेही सुरुवातीपासूनच त्याच्या नियोजनापासून बाजूला राहिले. त्यामुळे शासनाचाच हा कार्यक्रम शिंदे गटाचा असे त्याला स्वरूप आले. विरोधी पक्षांच्याही सर्वच आमदारांनी त्याकडे पाठ फिरवली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे