अनिल पाटीलसरुड : आता पर्यंत आपण एका गायीने एकाच वेळी एक किंवा दोन वासरांना जन्म दिल्याचे ऐकले होते. परंतु सरुड ( ता . शाहूवाडी ) येथील विक्रम बाळासो लाड यांच्या गायने एकाच वेळी चक्क तीन वासरांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे ही तिन्ही वासरे जीवंत असून ही गायही ठणठणीत आहे. या घटनेने सरुड परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.सरुड येथील शेतकरी विक्रम लाड यांची जर्सी जातीची गाय गाभण होती. गुरुवारी पहाटे ही गाय व्याली. या गायने प्रथम पहाटे चार वाजता एका वासराला जन्म दिला, त्यांनतर सहा वाजवा दुसऱ्या वासराला तर एका तासाच्या अवधीनंतर म्हणजेच सकाळी सात वाजत तिसऱ्या वासराला जन्म दिला. यामध्ये दोन पाडी व एक कालवड आहे. गायसह ही तीन्ही वासरांची तब्येत ठणठणीत आहे.या घटनेने दिवसभर नागरिक मोठ्या कुतुहलाने ही वासरे पाहण्यासाठी बिरदेव माळ येथील विक्रम लाड यांच्या जनावरांच्या शेडकडे येत होते .
दुर्मीळ! गायीने दिला तीन वासरांना जन्म, शाहूवाडीतील सरुड मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 16:52 IST