शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

‘ए. वाय.’ यांची गाडी गॅरेजला, ‘आर. कें’ची कपंनीत; राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या गाड्यांची अवस्था 

By राजाराम लोंढे | Updated: January 3, 2024 12:54 IST

राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना गाड्या देणार, देखभालीचा खर्च आवाक्याबाहेर

राजाराम लोंढे कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांना ‘स्कार्पिओ’ गाड्या दिल्या होत्या. आज, त्या गाड्यांची अवस्था खूपच वाईट असून तीन जिल्हाध्यक्षांकडून फिरून ए. वाय. पाटील यांच्याकडे आलेली गाडी सध्या गॅरेजला लावून आहे. तर, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्याकडील गाडी दुरुस्तीसाठी कंपनीत सोडलेली होती, ती गेली अनेक वर्षे तिथेच आहे. पक्ष नवीन गाड्या देतो, पण त्याच्या इंधनासह देखभाल दुरुस्तीचा खर्च पदाधिकाऱ्यांच्या आवाक्याबाहेर असतो.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने राज्यातील जिल्हाध्यक्ष व महानगर शहराध्यक्षांना आलिशान गाड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, पक्षाने यापूर्वी दिलेल्या गाड्यांची अवस्था खूपच वाईट आहे. पक्ष विस्तारासह निवडणुकांच्या काळात पदाधिकाऱ्यांना जिल्हाभर फिरावे लागते. यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांना गाड्या प्रदान केल्या होत्या. त्यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून स्वर्गीय लेमनराव निकम तर शहराध्यक्ष म्हणून आर. के. पोवार कार्यरत होते.दरम्यानच्या काळात जिल्हाध्यक्ष निकम यांच्या राजीनाम्यानंतर माजी आमदार के. पी. पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांच्याकडे गाडी गेली. त्यांच्यानंतर ए. वाय. पाटील हे जिल्हाध्यक्ष झाले आणि गाडी त्यांच्याकडे गेली. तोपर्यंत गाडीचा खुळखुळा झाला होता. त्यांनी थेट गॅरेजला नेऊन लावली.

शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी काही काळ गाडी वापरली, तोपर्यंत पक्षाने शहराध्यक्ष पदी राजेश लाटकर यांना संधी दिली. गाडी त्यांच्याकडे गेली, तोपर्यंत गाडीची कामे निघाली. त्यांनी संबधित कंपनीत कामासाठी सोडली. तोपर्यंत त्यांना बाजूला करून ‘आर. के.’ पुन्हा शहराध्यक्ष झाले. त्यांनी गाडीचा शोध घेतला तर गाडी कंपनीत असल्याचे समजले. त्यांनी कंपनीत संपर्क साधला तर गाडी दुरुस्तीचा खर्च चार लाख सांगितल्यानंतर त्यांनी गाडी तिथेच सोडली.सत्तेतील पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा

सत्तेतील पक्ष असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा अधिक आहेत. केवळ गाड्या देऊन त्याच्या इंधनासह चालक, देखभाल दुरुस्तीचा खर्चही अनेकांच्या आवाक्याबाहेरचा असतो. त्यामुळे पक्षाने महिन्याला यासाठीचा स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.काँग्रेसनेही दिल्या होत्या गाड्याकाँग्रेस पक्षानेही आपल्या जिल्हाध्यक्षांना गाड्या प्रदान केल्या होत्या. त्यावेळी आमदार पी. एन. पाटील हे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी स्वत:ची गाडी वापरणेच पसंत केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस