शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर गारठलं; तापमान घसरले १५ डिग्रीपर्यंत, कडाका वाढत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:49 IST

दोन दिवसांत वातावरणात झाला बदल

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, हळूहळू थंडी वाढत आहे. सोमवारी किमान तापमान १५ डिग्रीपर्यंत खाली आले असून, कमाल तापमानही २९ पर्यंत असल्याने गारठा जाणवू लागला आहे. आगामी आठ दिवस तापमानात आणखी घट होणार असून, थंडीचा कडाका वाढणार आहे. सततच्या पावसाने यंदा थंडीची चाहूल लागते की नाही ? असे वाटत असतानाच बोचऱ्या थंडीने सुरुवात केली आहे.साधारणत: ऑक्टाेबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून आपल्याकडे थंडीची चाहूल लागते. पण, यंदा मे महिन्यात सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहिला. त्यामुळे थंडी येणार की नाही ? असेच वातावरण राहिले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस थांबला, पण थंडी नव्हती. जिल्ह्याचे किमान तापमान २२ ते कमाल ३१ डिग्रीपर्यंत राहिले. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदलत होत आहे. पहाटेपासून धुके आणि थंड वारा वाहत आहे. सायंकाळी साडेसहानंतर हवेत गारठा सुरू होतो. रात्रभर थंड वारे वाहत असल्याने अंगातून गारठा जात नाही.आगामी आठ दिवस जिल्ह्याचे किमान तापमान कमी होत जाणार आहे. शुक्रवारी (दि. १४) किमान तापमान १३ डिग्रीपर्यंत खाली येणार असल्याने अंग गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव येणार आहे.

नदी, पाणवठ्यावर अधिक कडाकानदी, ओढ्यांसह पाणवठ्यावर थंडीचा अधिक कडाका जाणवतो. पाऊस उघडला असला तरी जमिनी अजून चांगलीच ओल आहे. त्यामुळेच, शिवारात थंडी अधिक जाणवते.आगामी पाच दिवसांत असे राहणार तापमान, डिग्रीमध्ये ...वार - किमान तापमान - कमाल तापमान 

  • मंगळवार - १५ - ३० 
  • बुधवार - १५ - २९ 
  • गुरुवार - १४ - ३० 
  • शुक्रवार - १३ - २८ 
  • शनिवार - १४ - २९

मागील पाच वर्षांत १० नोव्हेंबरला असे राहिले तापमान, डिग्रीमध्ये...वर्ष - किमान तापमान - कमाल तापमान 

  • २०२१ - १९.४ - ३१ 
  • २०२२ - १९ - ३२ 
  • २०२३ - १५ - २९ 
  • २०२४ - १४ - २८ 
  • २०२५ - १५ - २९ 
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Shivers as Temperature Drops to 15 Degrees; Cold Intensifies

Web Summary : Kolhapur experiences a sudden drop in temperature, reaching 15 degrees. The cold wave is expected to intensify over the next week. Minimum temperature is predicted to fall to 13 degrees. River areas feel coldest.