शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

LokSabha2024: मतांच्या धुव्रीकरणावरच विजयाचे गणित, हातकणंगलेत तिरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 12:37 IST

विश्वास पाटील कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतांच्या धुव्रीकरणामध्येच विजयाचे गणित लपले आहे. सहा मतदारसंघांत जो चार लाखांचा आकडा ...

विश्वास पाटीलकोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतांच्या धुव्रीकरणामध्येच विजयाचे गणित लपले आहे. सहा मतदारसंघांत जो चार लाखांचा आकडा पार करील तो विजयाच्या दिशेने वाटचाल करील असे चित्र आहे. कोल्हापूरप्रमाणेच या मतदारसंघातही महायुतीकडे नेत्यांची संख्या जास्त आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी संघटनात्मक बळ, आर्थिक ताकद जास्त असली तरी ती प्रत्यक्षात मतापर्यंत किती पोहोचते हे महत्त्वाचे आहे. उद्धवसेनेचे सत्यजित पाटील यांच्याबद्दल नवीन उमेदवार म्हणून सहानुभूती आहे. राजू शेट्टी यांनाही शेतकऱ्यांसाठी राबणारा नेता म्हणून प्रतिसाद मिळत असल्याचा दावा ते करत आहेत.या मतदारसंघात एकूण १८ लाख ११ हजार मतदान आहे. गेल्या निवडणुकीत ६७ टक्के मतदान झाले होते. यावर्षी उन्हाचा तडाखा जास्त आहे. त्यामुळे ते ६५ टक्के झाले तरी ११ लाख ७७ हजार मतदान होईल. एकूण २७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे वंचितसह इतर २४ उमेदवारांनी ७७ हजार मते घेतली, तर ११ लाख मते राहतात. त्यामध्ये तीन प्रमुख उमेदवारांचा विचार केल्यास ३ लाख ६६ मतांची विभागणी होते; परंतु सद्य:स्थितीत ही लढत दुरंगीकडे सरकली आहे. त्यामुळेच ४ लाखांची जो उमेदवार बेगमी करील तो विजयाचा दावेदार होऊ शकतो, असे चित्र आज दिसते.

  • गेल्या निवडणुकीत खासदार माने यांना मुख्यत: इचलकरंजी शहर, हातकणंगले आणि शाहूवाडी मतदारसंघाने चांगले मताधिक्य दिले. शेट्टी यांना शिराळा, वाळवा आणि शिरोळने मताधिक्य दिले. या निवडणुकीत या दोन्ही गृहितकांना धक्का बसला आहे.
  • या निवडणुकीत स्थानिक उमेदवार म्हणून शाहूवाडी मतदारसंघ पाठीशी राहील, शिवाय शिराळा-वाळव्यातही मताधिक्य घेऊ असे सत्यजित पाटील यांना वाटते. सत्यजित पाटील हे हातकणंगले, शिरोळ व इचलकरंजी मतदारसंघाला नवखे आहेत; परंतु ती त्यांची कमकुवत नव्हे तर आज जमेची बाजू ठरत आहे. नवीन उमेदवार असल्याचा लाभ त्यांना होत असल्याचे दिसत आहे.
  • शिरोळ व वाळवा मतदारसंघातील मताधिक्य आपल्याला विजयापर्यंत नेईल असे शेट्टी यांना वाटते. ओबीसी, मुस्लीम मतेही आपल्या पाठीशी राहतील, असा विश्वास त्यांना आहे. इचलकरंजीत पुरेशी स्पेस तयार करू शकलो नाही हे त्यांनाही मान्य आहे. तिथे ते काही वेगळे गणित मदतीला येईल असे प्रयत्न सुरू आहेत. शिरोळमध्ये गतवेळेपेक्षा स्थिती चांगली असल्याचा अनुभव त्यांना येत आहे.
  • इचलकरंजी शहरात आपल्याला मताधिक्य मिळेल असे खासदार माने यांना वाटते. तिथे भाजपचे केडर आहे. फक्त मोदी यांच्याकडे पाहून मतदान करणारा मतदार आहे. हातकणंगले मतदारसंघ हा त्यांच्या घरचा मतदारसंघ आहे. त्यामुळे हातकणंगलेसह शिरोळमध्येही आपल्याला चांगली मते मिळतील असे त्यांना वाटते. प्रत्यक्षात इचलकरंजी शहरात न सुटलेला पाणी प्रश्न कितपत उसळी घेतो, हे देखील महत्त्वाचे आहे.
  • या मतदारसंघातील सहापैकी तीन आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. तीन महायुतीतील घटक पक्षांचे आहेत. भाजप व शिंदेसेनेचा स्वत:चा एकही आमदार नाही. आता विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजेंद्र यड्रावकर हे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी माने यांना मत द्या, असा प्रचार करत आहेत; परंतु या तिन्ही आमदारांची मते कितपत माने यांच्या पदरात पडतात, हे निकाल ठरवणारे आहे.
  • गेल्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी घेतलेली सव्वालाख मते शेट्टी यांचा पराभव करून गेली. यावेळी वंचितचा फॅक्टर फारसा प्रभावी नाही; परंतु लढत मुख्य कोण दोघांत होते आणि तिसरा कुणाची किती मते घेतो, यावरच विजयाचे गणित अवलंबून राहील.
  • गेल्या निवडणुकीत मराठा मतांचे धुव्रीकरण माने यांना पहिल्याच प्रयत्नांत खासदार करून गेले. यावेळी ही मते कितपत विभागतात की कुण्या एकाच्याच पारड्यात जातात हा कळीचा मुद्दा आहे. सध्या तरी ती एकाच दिशेने एकवटत असल्याचे वातावरण दिसत आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४hatkanangle-pcहातकणंगलेdhairyasheel maneधैर्यशील मानेRaju Shettyराजू शेट्टीSatyajit Patilसत्यजित पाटील