शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: अवचितवाडी येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू, गावात उडाली खळबळ; घातपाताचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 11:49 IST

पोलिस अधिक तपास करीत आहेत.

धामोड : राधानगरी तालुक्यातील अवचितवाडी येथे तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. आनंदा हरी किरूळकर (वय ४५) असे या मृत तरुणाचे नाव आहे. आनंदा याचा मृतदेह त्याच्याच पोल्ट्री फार्मच्या शेजारी पडल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटनेची वर्दी केळोशी बु॥ पोलीस पाटील शशीकांत दिघे व खामकरवाडीच्या दिपाली ऱ्हायकर यांनी राधानगरीपोलिस ठाण्यात दिली.आनंदा किरूळकर याचा गावापासून हाकेच्या अंतरावर स्वतःचा पोल्ट्री फॉर्म आहे. मुख्य रस्त्याला लागूनच हे पोल्ट्री फार्मचे शेड असल्याने लोकांची वर्दळ असे. पण काल, गुरुवारी रात्री उशिर झाला तरी ते घरी आले नाहीत. म्हणुन त्यांच्या पत्नी संपदा व मुलगा अनिकेत पोल्ट्री फार्मकडे गेले. मात्र, आनंदा त्याठिकाणी नसल्याने ते घरी गेले. फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होत नव्हता. दरम्यानच, आज, शुक्रवार सकाळी गावातील काही लोकांना आनंदा याचा मृतदेह पोल्ट्री फार्मच्या शेजारीच आढळून आला. ही बातमी गावात समजताच नातेवाईकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. आनंदा यांच्या शरिरावरील व्रण पाहून त्याचा घातपात करून त्याला ठार मारल्याचा संशय व्यक्त केला. राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे पाठवला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस