शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात बँकेच्या मॅनेजरनेच घातला ग्राहकांना कोटीचा गंडा, आयसीआयसीआय बँकेतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:11 IST

१२ ग्राहकांचे पैसे स्वत:च्या खात्यावर वळवले, मॅनेजर विकास माळी अटकेत

उद्धव गोडसेकोल्हापूर : आयसीआयसीआय बँकेच्या क्रशर चौक आणि शिरोली एमआयडीसी शाखेतील मॅनेजर विकास आण्णाप्पा माळी (वय ३८, सध्या रा. जरगनगर, कोल्हापूर मूळ रा. केंपवाड, ता. अथणी, जि. बेळगाव) याने १२ ग्राहकांसह बँकेला कोटीचा गंडा घातला. मुदत ठेव आणि मॅच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ती रक्कम चार मित्रांच्या खात्यावर वर्ग केली.याप्रकरणी फिर्याद दाखल होताच जुना राजवाडा पोलिसांनी माळी याला सोमवारी (दि. २७) रात्री अटक केली. नामांकित बँकेच्या ब्रँच मॅनेजरनेच ग्राहकांना गंडा घातल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.फिर्यादी गजानन सदाशिव गायकवाड (वय ४४, रा. कुपवाड रोड, सांगली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास माळी हा जुलै २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधित आयसीआयसीआय बँकेच्या शिरोली एमआयडीसी आणि क्रशर चौकातील शाखेत मॅनेजर पदावर कार्यरत होता. त्याने काही ग्राहकांना मुदत ठेव आणि मॅच्युअल फंडातून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार १२ ग्राहकांचे ९६ लाख ६० हजार १८ रुपये त्याने चार मित्रांच्या खात्यावर वर्ग केले. त्यानंतर ती रक्कम स्वत:च्या बँक खात्यावर वर्ग केली. पुढे ते पैसे झेरोधा ब्रोकिंगमध्ये स्वत:च्या आयडीवर गुंतवले. याचा कोणताही लाभ ग्राहकांना दिला नाही.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही ग्राहकांनी बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांकडे तक्रार केली. त्यानंतर बँकेने केलेल्या चौकशीत माळी याने १२ ग्राहकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. विश्वासाने खात्यावर ठेवलेले पैसे बँक मॅनेजरनेच लंपास केल्याने ग्राहकांना धक्का बसला.

यांची झाली फसवणूकतेजोमय हॉस्पिटल - डॉ. महेश दळवी (४८ लाख), स्नेहा भोसले (१७ लाख ५० हजार), श्रद्धा भोसले (५ लाख), मानवेंद्रनाथ जोशी ( ७ लाख ५० हजार), प्रकाश जगदाळे (५ लाख), आरती भावे (४ लाख), रवी गुड्स ट्रान्सपोर्ट-रवींद्र भावे (दीड लाख), उद्धव इंगळे (३ लाख १० हजार १८), गजानन सावंत (१ लाख), विशाल सोनवणे (१ लाख), संतोष पठारे (५० हजार), न्यूमॅटिक सेल्स अँड प्रा. लि. सर्व्हिसेस-नितीन शिंदे (अडीच लाख)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीbankबँकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस