शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक योजनांच्या मान्यतेचे अधिकार जिल्ह्यांना देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 12:13 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मांडलेले सर्व विषय अभ्यासपूर्ण असून ते राज्यस्तरावर राबवण्यासारखे आहेत अशा शब्दात मंत्री पाटील यांचे कौतुक केले.

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनांच्या तांत्रिक मान्यतेचे अधिकार जिल्हा स्तरावर हस्तांतरित करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. शहरी लोकसंख्येचा विचार करून निधी वाटपाच्या सूत्रामध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याच्या वार्षिक योजना आराखड्यासाठी ४२५ कोटी रुपये दिले जातील.ज्या जिल्ह्यांचा निर्देशांक, विकासाचा दर जादा आहे, त्या जिल्ह्यांना कमी निधी मिळणार नाही, अशा रीतीने निधी वाटप सूत्रामध्ये बदल करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली.जिल्हा वार्षिक योजनांतर्गत निधी वाटपाचे निकष, तांत्रिक मान्यता, अनुज्ञेय कामे, स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करणे या विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात आली.कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मांडलेले सर्व विषय अभ्यासपूर्ण असून ते राज्यस्तरावर राबवण्यासारखे आहेत अशा शब्दात मंत्री सतेज पाटील यांचे कौतुक केले. शासकीय इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित शासकीय रुग्णालयांचे बांधकाम विस्तारीकरण,दुरुस्ती व औषधसाठा यासाठी निधी उपलब्ध करून देणे, राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेतून २-४-६ संकरित दुधाळ गायी-म्हैशी गट वाटप योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ तालुक्यांचा समावेश करणे, पोलीस व तुरुंग विभागाला पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करणे या विषयांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगून मंत्री पाटील यांनी मांडलेल्या विषयांबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करण्याच्या सूचना दिल्या.कोल्हापूरला अधिक निधी द्यावा : सतेज पाटीलजिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २५ जानेवारीला झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यासाठी निधी वाटप निकषानुसार ४०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली होती.यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी निधी वाटपाचे सध्या लागू असणाऱ्या निकषाचे सूत्र बदलून राज्याला जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांना अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना करून कोल्हापूर जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक जास्त असल्यामुळे जिल्ह्याला कमी निधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील