शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
2
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
3
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
4
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
5
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
6
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
7
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
8
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
9
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
10
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
11
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
12
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
13
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
14
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
15
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
16
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
17
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
18
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
19
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
20
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’चे संकलन वाढले, वासाचे, दुय्यम प्रतीचे दूध कमी झाले; प्रतिदिनी किती झाली वाढ...वाचा

By राजाराम लोंढे | Updated: November 24, 2025 15:52 IST

पशुखाद्यासह कृती कार्यक्रमाचे फलित

राजाराम लोंढेकोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या दूध संकलनात झपाट्याने वाढ होत असतानाच वासाचे व दुय्यम प्रतीच्या दुधाचे प्रमाण कमी होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात ८ लाख ४४ हजार ६७२ लिटरने दुय्यम प्रतीचे तर ४ हजार ४३१ लिटर वासाचे दूध कमी झाले आहे. संघाच्या फर्टिमिन्स प्लस पशुखाद्याबरोबरच कृती कार्यक्रमाचे हे फलित मानले जात आहे.दूध हे नाशवंत असल्याने ते काढल्यानंतर ठराविक वेळेतच त्याच्यावर प्रक्रिया होणे गरजेचे असते. ‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत वासाच्या दुधाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या मुद्द्यावरून विरोधकांनी रान तापवून सत्तांतर घडवले होते. जनावरांच्या गाेठ्यापासूनच चांगल्या प्रतीचे दूध कसे येईल, यासाठी गेल्या साडेचार वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत.मध्यंतरी तीन-चार महिने फर्टिमिन्स प्लस हे मोफत दिले. यामुळे जनावर सदृढ राहते, दूध उत्पादन वाढतेच, त्याचबरोबर दुधाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. त्याचे परिणाम सध्या दिसत असून, ऑक्टोबर २०२४ व २०२५ मधील दूध उत्पादन, वासाचे दूध आणि दुय्यम प्रतीच्या दुधाची तुलना पाहता, यामध्ये दुधाचे उत्पादन वाढले, पण वासाचे आणि दुय्यम प्रतीच्या दुधात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसते.प्रतिदिनी दूध संकलनात ५५ हजार लिटरची वाढऑक्टोबर २०२४ च्या तुलनेत ऑक्टोबर २०२५ या महिन्यात एकूण दूध संकलनात १७ लाख ५ हजार लिटर्सने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये म्हैस दूध तब्बल १३ लाख ८३ हजार ६०९ लिटर्सने वाढले आहे.तुलनात्मक आकडेवारी..दूध - ऑक्टोबर २०२४ चे संकलन (लिटर) - ऑक्टोबर २०२५ चे संकलन (लिटर) 

  • म्हैस - २,१९,८९,३६८ - २,३३,७२,९७७ 
  • गाय - २,६६,०२,६९० - २,६९,२४,८०५ 

वासाचे व दुय्यम प्रतीचे दूध (लिटरमध्ये) :दूध - ऑक्टोबर २०२४ - ऑक्टोबर २०२५ 

  • वासाचे - ३२,१२० - २६,६८९ 
  • दुय्यम प्रतीचे - ५३,७२,८८७ - ४५,२८,२१५

दुय्यम प्रत, वासाचे दूध निघूच नये, यासाठी विशेष कृती कार्यक्रम सुपरवायझरना दिला होता. त्यानुसार दुय्यम प्रतीच्या दुधाचे सेंटर शोधून तेथील दूध उत्पादकांचे प्रबोधन केले. त्यात मध्यंतरी मोफत फर्टिमिन्स प्लसचे वाटप केले. त्याचबरोबर हिरव्या चाऱ्याऐवजी ‘टीएमआर’चा वापर वाढला. त्याचा एकत्रित चांगला परिणाम दिसत आहे. - डॉ. योगेश गोडबोले (कार्यकारी संचालक, गोकुळ)

English
हिंदी सारांश
Web Title : Gokul's milk collection increases; reduction in poor quality milk.

Web Summary : Gokul Dairy sees milk collection rise, reducing bad milk. October witnessed a 1.7 million-liter increase, especially buffalo milk. Initiatives like Fortimins Plus and farmer education improved milk quality, reducing inferior milk by 8.44 lakh liters.