शिरोळ : शिरोळ नगरपालिकेच्या दुसर्या पंचवार्षीक निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोकराव माने या दोघांच्या आघाडींचा पराभव करत काँग्रेस, स्वाभिमानी, यादव गट यांच्या शिवशाहू आघाडीने नगराध्यक्ष पदासह 15 नगरसेवक निवडून आणत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. आमदार यड्रावकर यांच्या शाहू आघाडीला 3 जागेवर समाधान मानावे लागले तर आमदार अशोकराव माने यांच्या ताराराणी आघाडीला पराभावासह एकही जागा मिळाली नाही. तर, दोन अपक्षांनी खाते उघडले आहे.शिरोळ येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आज, रविवारी मतमोजणी झाली. सुरुवातीपासूनच मताची आघाडी घेतल्याने शिवशाहू आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार योगिता कांबळे व 15 उमेदवार निवडून आले. योगिता कांबळे यांना दहा हजार 595 मते मिळाली. तर विरोधी शाहू आघाडीच्या उमेदवार श्वेता काळे यांना 4658 तर आमदार अशोकराव माने यांच्या सूनबाई ताराराणी आघाडीच्या पदाच्या उमेदवार सारिका माने यांना 3563 मते मिळाली.
Web Summary : In Shirol, the Shiv-Shahu Alliance secured a majority in the municipal elections, winning 15 seats including the mayoral position. Rajendra Patil-Ydrawkar and Ashokrao Mane's alliances were defeated. Yogita Kamble won the mayoral race decisively.
Web Summary : शिरोल में, शिव-शाहू गठबंधन ने नगरपालिका चुनावों में बहुमत हासिल किया, जिसमें महापौर पद सहित 15 सीटें जीतीं। राजेंद्र पाटिल-यड्रावकर और अशोकराव माने के गठबंधन पराजित हुए। योगिता कांबले ने महापौर की दौड़ निर्णायक रूप से जीती।