शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

'प्राडा'सोबतच्या करारातून व्यवसायवृद्धी व्हावा, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:16 IST

करारामुळे कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले असून त्याचा उपयोग येथील चर्मकार उद्योगाच्या व्यवसायवृद्धीसाठी व्हावा व येथे जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होणेसाठी व्हावा

कोल्हापूर : प्राडा, लिडकॉम, लिडकार यांच्यात झालेल्या कराराचा उपयोग कोल्हापुरातील चर्मकार उद्योगाच्या व्यवसाय वृद्धीसाठी व्हावा, या कराराची संपूर्ण माहिती मिळावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे आजपर्यंत झालेला घटनाक्रम जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करत झालेल्या कराराची माहिती मिळावी, अशी विनंती केली. करारामुळे कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले असून त्याचा उपयोग येथील चर्मकार उद्योगाच्या व्यवसायवृद्धीसाठी व्हावा व येथे जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होणेसाठी व्हावा अशी मागणी त्यांनी केली. भूपाल शेटे यांनी लिडकॉमच्या कार्यालयात असणाऱ्या समस्या मांडल्या व तेथील गैरकारभाराबाबत आपण प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याची विनंती केली.यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी पूर्वी कोल्हापुरी चप्पलची ओळख फक्त देशपातळीवर होती. परंतु या करारामुळे कोल्हापूरची ‘मेड इन कोल्हापूर’ अशी आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण होणार असून जिल्ह्याच्या परंपरेचा सन्मान वाढणार आहे. या भागीदारीमुळे कारागिरांना प्रशिक्षण, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

या कराराचा फायदा दोन-चार महिन्यांत दिसून येईल असे सांगत कराराबाबत कोणताही गैरसमज पसरणार नाही याची काळजी चप्पल उत्पादकांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. लिडकॉमबाबत असणाऱ्या शंका तेथील कार्यालयास भेट देऊन दूर केल्या जातील तसेच कराराबाबत सविस्तर माहितीसाठी लवकरच सर्वांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करू, असेही त्यांनी सांगितले.यावेळी कोल्हापूर जिल्हा फुटवेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार, उपाध्यक्ष राजन सातपुते, दीपक खांडेकर, बाळासाहेब गवळी, मनोज गवळी, विलास मालेकर, अशोक गायकवाड, राहुल नष्टे उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur trade body seeks benefits from Prada deal for footwear.

Web Summary : Kolhapur Chamber of Commerce seeks clarity on the Prada deal. They want it to boost local footwear, create jobs, and address Leadcom issues. The district collector assures support, international market access, and a meeting for detailed information, expecting benefits soon.