शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शेतकरी संघाच्या जागेचा अखेर प्रशासनाने घेतला ताबा, नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या भाविकांची सोय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 12:31 IST

प्रशासनाने ताबा घेतल्यानंतर सभासदांमधून संताप 

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर दर्शनमंडपासह भाविकांच्या इतर सोयी सुविधांसाठी भवानी मंडप येथील शेतकरी सहकारी संघाच्या जागेवर जिल्हा प्रशासनाने रविवारी दुपारी ताबा घेतला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव तथा राधानगरीचे प्रांतांधिकारी सुशांत बनसोडे, करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे, करवीरचे मंडल अधिकारी संतोष पाटील यांनी पोलिस बंदोबस्तात ताबा घेऊन तत्काळ जागेची साफसफाई केली.नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी सुमारे दीड लाख भाविक येतात. मंदिर परिसरातच दर्शन रांगेची व्यवस्था केली जाते. मात्र, मंदिर परिसरातील मोकळा परिसर व्यापला जातो. या दरम्यान काही अनूचित घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने परिसर मोकळा असणे गरजेचे आहे.

संघाच्या तीन मजल्यावर दर्शन मंडप, स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष, प्राथमिक उपचार केंद्र, इतर आवश्यक सुविधा भाविकांना द्यायच्या आहेत. यासाठी ही जागा ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी दिला होता. संघाला दोन दिवस सुटी असल्याने रविवारी दुपारी जिल्हा प्रशासनाने या जागेचा ताबा घेतला. तत्काळ जागेची साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे.दरम्यान, प्रशासनाने ताबा घेतल्यानंतर सभासदांमधून संताप व्यक्त होत आहे. आज, सोमवारी दुपारी बारा वाजता संघाच्या भवानी मंडप येथील कार्यालयात सभासद, संघाचे माजी संचालक व कर्मचाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाने रविवारी कुलपे तोडून ताबा घेतला आहे. याबाबत, आज बैठक बोलावली असून, सभासद जो निर्णय घेतील, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल. - सुरेश देसाई (अध्यक्ष, अशासकीय मंडळ, शेतकरी संघ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर