शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Cyber ​​Chowk Accident: ट्रकखाली चिरडलेल्या कारला बसचा टेकू अन् रोखला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:13 IST

आता आपण संपलोच असे एका क्षणी वाटून गेले.

पोपट पवार

कोल्हापूर : सिग्नलवर थांबलेल्या कारला मागून आलेल्या ट्रकने जोराची धडक देत ट्रक डिव्हायडरवरून थेट कारवर कोसळला. कारचा भाग पूर्णपणे चेपत एका बसवर टेकू बनून राहिला. या दोन्ही वाहनांमध्ये चेंदामेंदा झालेल्या कारमधील व्यक्ती जिवंत राहिली असेल असे कुणीच म्हणत नव्हते. पण, बसचा टेकू मिळाल्यामुळे कारमधील व्यक्ती अगदी सहीसलामत असल्याचे पाहून 'मृत्यू जवळ आला पण बसने तो थांबवला' याचा याचि देही, याचि डोळा प्रत्यय मंगळवारी सायंकाळी सायबर चौकात आला. सुनील रेडेकर असे त्या नशीबवान व्यक्तीचे नाव.सायंकाळी सातची वेळ. पार्वती पार्क, कळंबा रोडला राहणारे रेडेकेर हे त्यांच्या गोकुळ शिरगाव शॉपमधील काम आटोपून उद्यमनगरातील त्यांच्या दुसऱ्या शॉपमध्ये निघाले होते. त्यांची ही रोजचीच वेळ. सायबर चौकात सिग्नल सुरू असल्याने त्यांची कार काही मीटर अलीकडेच थांबली होती. इतक्यात मागून उसाने भरलेला ट्रक भरधाव वेगात डिव्हायडरला धडकून थेट शेजारील कारवर उलटला. यात रेडेकर यांची कार पूर्णपणे चेपली. मात्र, तिचा काही भाग शेजारील युका डायग्नोस्टिक कंपनीच्या बसवर गेल्याने कारला बसचा आधार मिळाला. हा अपघात इतका भयावह होता की रेडेकर यांना आता आपण संपलोच असे एका क्षणी वाटून गेले. त्यांनी कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याच दिशेने त्यांना बाहेर पडता येईना. अपघातात कारच्या एका बाजूची काच फुटल्याने त्यातून त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. इतक्यात पाठीमागे दुचाकीवर असलेले सद्दाम देसाई व आशिष कदम हे दोन युवक त्यांच्यासाठी देवदूतासारखे मदतीला धावून आले. त्यांनी रेडेकर यांना मदत करत कारमधून सुखरूपपणे बाहेर काढले.मी जिवंत आहे....रेडेकरांना खरे वाटेनाअपघातातील कार दोन्ही वाहनांच्यामध्ये घुसल्याने तिचा पुरता चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे या अपघातातून आपण जिवंत बाहेर आलोय याचेच रेडेकर यांना आश्चर्य वाटत होते.वेदनेपेक्षा मी जिवंत राहिलो याचेच समाधानया अपघातात टेम्पोचालक अभिषेक माळी हाही किरकोळ जखमी झाला. गडमुडशिंगीचा रहिवासी असलेल्या अभिषेकचा किराणा माल दुकानदारांना पोहोचवण्याचा व्यवसाय आहे. कागलहून तो माल घेऊन राजारामपुरीत जात असताना सिग्नलवरच त्याच्या टेम्पोला ट्रकने मागून धडक दिली. परिणामी, पुढच्या वाहनाला धडकून टेम्पोचा पुढचा भाग आतमध्ये गेला. यात प्रसंगावधान पाहून तो केबिनमधून तत्काळ बाहेर पडला. त्यात त्याच्या पायाला दुखापत झाली. हातापायाला लागल्याच्या वेदनेपेक्षा जिवंत राहिलो याचेच समाधान तो मानत हाेता.

बघ्यांची प्रचंड गर्दीअपघाताची माहिती सोशल मीडियातून वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काही वेळात बघ्यांची प्रचंड गर्दी उसळली. गर्दी हटवण्यासाठी पोलिस वारंवार सूचना देत होते. अखेर बळाचा वापर करून गर्दी पांगवावी लागली. गर्दीमुळे मदतकार्यात अडथळे झाले.रस्त्यावर डिझेलअपघात होताच एक कार आणि टेम्पोची इंधन टाकी फुटली. रस्त्यावरून डिझेलचा लोट वाहत होता. आग लागण्याचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी डिझेलवर माती टाकली. या परिसरातील गर्दी हटवून बॅरिकेडस् केले. वाहतूक वळवून अपघातग्रस्त वाहने हटवण्यात आली.

सतराजणांचे दैवच बलवत्तर...गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील कामे आटोपून अनेक व्यावसायिक, उद्योजक घरी जाण्याच्या घाईत होते. टेम्पोचालक अभिषेक माळी हा आट्याची पोती घेऊन राजारामपुरीत निघाला होता. युका डायग्नोस्टिक कंपनीची बस १७ कर्मचाऱ्यांना कोल्हापुरात सोडण्यासाठी निघाली होती. त्याचवेळी पाठीमागून आलेला ट्रक त्यांच्यासाठी काळ बनला होता. मात्र, वेळ चांगली म्हणून सर्वजण बचावले.चालकाला गतीचा अंदाज आला नाहीट्रक चालक प्रदीप सुतार हा दत्तवाड (ता. शिरोळ) येथून ऊस भरून निघाला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास ते हुपरी येथे चहासाठी थोडा वेळ थांबले होते. त्यानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावरून शिवाजी विद्यापीठ मार्गे ते केएसबीपी चौकातून सायबर चौकमार्गे पुढे गगनबावड्याकडे निघाले होते. उतारावर ट्रकच्या गतीचा अंदाज आला नाही. यातच गिअर बदलताना गोंधळून नियंत्रण सुटल्याचे त्यांनी सांगितले.

आपत्कालीन यंत्रणा कुठे होती?अपघात किंवा अन्य आपत्तीत तातडीने मदत पोहोचवता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे आपत्कालीन विभाग आहे. मात्र, शहरातील मोठ्या अपघातांनंतर आपत्कालीन यंत्रणा अपवादानेच घटनास्थळी दिसते. सायबर चौकातील अपघातानंतरही आपत्कालीन यंत्रणा दिसली नाही, अशी चर्चा अपघातस्थळी सुरू होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Accident: Bus Saves Man Crushed by Truck at Cyber Chowk

Web Summary : A Kolhapur man, Sunil Redekar, survived a horrific accident at Cyber Chowk when a truck crushed his car. A nearby bus cushioned the impact, saving his life. Two bikers helped him escape. He sustained minor injuries while the truck driver was also unharmed.