शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'तो' व्हिडीओ कळंबा कारागृहातील नव्हे! कारागृह प्रशासनाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 12:19 IST

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील गुंड कुमार गायकवाड याच्या खुनातील प्रमुख संशयित आरोपी अमर माने याचा कारागृहातील फोटोसह गुरुवारी व्हायरल ...

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील गुंड कुमार गायकवाड याच्या खुनातील प्रमुख संशयित आरोपी अमर माने याचा कारागृहातील फोटोसह गुरुवारी व्हायरल झालेला मूळ व्हिडीओ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याच कारागृहातील नसल्याचे शुक्रवारी चौकशीत स्पष्ट झाले. हा व्हिडीओ भोपाळ कारागृहातील असल्याचे पुढे आले आहे.हा व्हिडीओ कुणीतरी खोडसाळपणाने कळंबा कारागृहातील असल्याचे भासवून व्हायरल केला. तरीही कारागृहात कैद्यांना मोबाइल मिळू नयेत यासाठी प्रशासन खबरदारी घेत असल्याचे कारागृह प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.राजेंद्रनगरातील गुंडांच्या दोन टोळ्यांमधील संघर्षातून कुमार गायकवाड याचा नोव्हेंबर २०२२ मध्ये खून झाला. त्या गुन्ह्यातील प्रमुख संशयित माने याच्यासह चौघे कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. माने गेले १३ महिने कारागृहात आहे. त्याचा जामीन अर्ज येत्या १ जानेवारीला जिल्हा न्यायालयासमोर येणार आहे. त्याला जामीन मिळू नये यासाठी त्याच्या विरोधकांनी भोपाळ कारागृहातील हा मूळ ४४ सेकंदांचा व्हिडीओ घेऊन त्यातील स्क्रीनशॉट काढून ते व्हायरल केल्याचे माने याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ही बाब त्यांनी कळंबा कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंग