शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

संपाच्या चक्रव्यूहात वस्त्रनगरी

By admin | Updated: August 26, 2015 00:13 IST

सरकारचे लक्ष नाही : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; इचलकरंजी झालीय आता आंदोलननगरी

राजाराम पाटील - इचलकरंजीसरकारचे लक्ष नाही आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी गांभीर्याने दखल घेत नाहीत, अशा चक्रव्यूहात वस्त्रनगरी अडकली आहे. सायझिंग कामगारांपाठोपाठ आता यंत्रमाग कामगारांचेही आंदोलन उभा राहत असल्याने इचलकरंजीचा नावलौकिक आंदोलननगरी असा होऊ लागला आहे.वस्त्रोद्योगात अग्रेसर असलेल्या शहरास कामगार चळवळ किंवा आंदोलने काही नवीन नाहीत; पण यापूर्वी कामगारांची वेतनवाढ असो, किंवा केंद्र सरकारने वस्त्रोद्योगावर लावलेला मूल्यवर्धित कर असो. त्या-त्यावेळी यंत्रमाग कारखानदार, कामगार यांचे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी एकत्रित येत. प्रसंगी शासकीय यंत्रणेची मदत घेतली जात असे अािण कामगार संपावर तोडगा काढला जाई. माजी खासदार कै. दत्ताजीराव कदम, कै. बाबासाहेब खंजिरे, माजी आमदार कै. एस. पी. पाटील, कामगार नेते कै. के. एल. मलाबादे, कै. सदाशिवराव मुरदंडे, धनपाल टारे अशी काही मोजकी नावे अद्यापही यंत्रमागधारक व कामगारांच्या मनात घर करून बसली आहेत.आंदोलनावेळी किंवा संपादरम्यान दिवसभर मोर्चे, सभा, मेळावे असले तरी सायंकाळी किंवा रात्री संपाबाबत तोडगा काढण्यासाठी प्रमुख नेतेमंडळींच्या बैठका होत. त्यामध्ये कामगार नेता आणि यंत्रमागधारकांचा नेता असा दुरावा नसे. सन्माननीय तोडगा काढण्याकडे सर्वांचीच एकवाक्यता असे. अगदी सहायक कामगार आयुक्त, तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक, जिल्हाधिकारी, आदी शासकीय अधिकाऱ्यांचेही सहाय घेतले. राजकीय वस्त्रे बाजूला ठेवण्यासाठी बहुतांशी बैठका शासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होत.नेमका याच गोष्टीचा अभाव गेल्या ३५ दिवसांपासून चाललेल्या सायझिंग-वार्पिंग कामगार संपात दिसत आहे. संपाबाबत तोडगा काढण्यासाठी २९ जुलैला मुंबईत कामगारमंत्र्यांकडे, ६ व १४ आॅगस्टला जिल्हाधिकाऱ्यांकडे, तर एकवेळ प्रांताधिकारी कार्यालयात आणि एकदा सहायक कामगार आयुक्तांकडे अशा विस्कळीत स्वरुपात बैठका झाल्या. मध्येच ८ आॅगस्टला आमदार सुरेश हाळवणकर व खासदार राजू शेट्टी यांनी दोन्ही बाजूंची मते आजमावली. अशा घडामोडीत वस्त्रोद्योग तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नामानिराळेच आहेत. त्यामुळे सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप ‘नवीन विक्रम’ करणार, अशीच संतप्त चर्चा वस्त्रनगरीत आहे. उच्च न्यायालयाची सुनावणी आता ३१ आॅगस्टलायंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या उच्च न्यायालयातील याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये, किमान वेतनाबाबत म्हणणे देण्यासाठी आणखीन मुदत मागून घेतली. त्यामुळे या याचिकेवर आता ३१ आॅगस्ट रोजी सुनावणी होईल. तसेच सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप सुरू असतानासुद्धा किमान वेतनातील फरकाची मागणी करणारे क्लेम अ‍ॅप्लिकेशन दाखल केल्याप्रकरणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही होऊ नये, असे निर्देश न्यायालयाने दिले असल्याचे इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.आवाडे-हाळवणकरांनी पुढाकार घ्यावाशहरात आतापर्यंत झालेली सर्व आंदोलने व राजकीय घडामोडी पाहिलेले आणि सर्व क्षेत्रात आदरणीय व्यक्ती म्हणून ज्ञात असलेले माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व शासनाशी समन्वय करून आमदार सुरेश हाळवणकर या दोघांनी पुढाकार घेऊन हा संप संपुष्टात आणावा. त्याचबरोबर सायझिंग, यंत्रमाग व प्रोसेसर्स अशा सर्व क्षेत्रातील आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या घटकामधील कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरुपी संपविण्यासाठी आदर्श तोडगा काढावा, अशी मागणी यंत्रमागधारकांबरोबरच काही सायझिंग कारखानदारांकडून होत आहे.