मोहरे येथे १०० जणांची टेस्ट, १० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:46+5:302021-06-27T04:17:46+5:30
मोहरे, काखे, ता, पन्हाळा येथील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती ग्रामपंचायतीच्या वतीने ॲन्टिजन टेस्ट करण्याचे ...

मोहरे येथे १०० जणांची टेस्ट, १० पॉझिटिव्ह
मोहरे, काखे, ता, पन्हाळा येथील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती ग्रामपंचायतीच्या वतीने ॲन्टिजन टेस्ट करण्याचे काम सुरू आहे. मोहरे येथील १०० नागरिकांची तर काखेमध्ये ९५ ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये मोहरे येथे १० तर काखेमध्ये ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोहरे येथील ६९ लोकांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी ४३ जणांनी कोरोनावरती मात केली तर २ जणांचा मृत्यू झाला. सध्या २४ रुग्ण अॅक्टिव आहेत. यावेळी मोहरेचे उपसरपंच प्रदीप डोईफोडे, सदस्य अमृता नथुराम मोरे, काखे सरपंच दगडू पाटील, ग्रा. पं. सदस्य, बोरपाडळे प्रा. आ. केंद्र डॉ. नीता पाटील, आरोग्यसेवक सचिन चव्हाण, अरुणा बर्गे, तलाठी सुमन धबधबे, पोलीस पाटील, आरोग्यसेविका आदी उपस्थित होते.