जेष्ठांच्या जलद चालण्याच्या स्पर्धेत तेंडुलकर, चव्हाण, दिडगे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 02:07 PM2019-01-21T14:07:32+5:302019-01-21T14:10:26+5:30

राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, शाहूपुरी पोलीस ठाणे व रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या जलद चालण्याच्या स्पर्धेत अनुराधा अनिल तेंडुलकर, सुभाष दिगंबर चव्हाण आणि दिलीप बाबासो दिडगे यांनी आपल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.

Tendulkar, Chavan and Didde first in the fast bowlers competition | जेष्ठांच्या जलद चालण्याच्या स्पर्धेत तेंडुलकर, चव्हाण, दिडगे प्रथम

राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, शाहूपुरी पोलीस ठाणे व रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रल यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांच्या जलद चालण्याच्या स्पर्धेतील पुरुष गटातील विजेत्या स्पर्धांसोबत संजय मोरे, आर. वाय. पाटील, पंडित कोरगावकर, आदी.

Next
ठळक मुद्देजेष्ठांच्या जलद चालण्याच्या स्पर्धेत तेंडुलकर, चव्हाण, दिडगे प्रथम४० ज्येष्ठ नागरिकांनी घेतला सहभाग

कोल्हापूर : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, शाहूपुरी पोलीस ठाणे व रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या जलद चालण्याच्या स्पर्धेत अनुराधा अनिल तेंडुलकर, सुभाष दिगंबर चव्हाण आणि दिलीप बाबासो दिडगे यांनी आपल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.

विजेत्यांना शाहूपुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रल प्रेसिडेंट आर. वाय. पाटील, पंडित कोरगावकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
ताराराणी चौक येथून  या स्पर्धेस प्रारंभ झाला.

तीन गटांत घेण्यात आलेल्या स्पर्धेत एकूण ४० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. ताराराणी चौक ते पितळी गणपती चौक व परत ताराराणी चौक असे पाच किलोमीटरचे अंतर स्पर्धेसाठी होते.

स्पर्धेचा अनुक्रमे निकाल असा

 ७० वर्षांवरील पुरुष गटात : सुभाष दिंगबर चव्हाण, अशोक भालचंद्र टोणे, माधव अंबादास म्हेत्रे. उत्तेजनार्थ : सुरेश बाबासो दिंदगे, सत्तार बानूलाल बागवान.

६० वर्षांवरील महिला गटात : अनुराधा अनिल तेंडुलकर, अश्विनी सुहास पोतनीस, अंबू काळूबा बोडके, नीता गरगटे, गौराबाई लोहार.

६० वर्षांवरील पुरुष गटात : दिलीप बाबासो दिडगे, गंगाराम कानू गावडे, रंगराव रामचंद्र मुळीक, मनोहर पारिसा मग्गेण्णवर, उदय आण्णासो पत्रावळे.

स्पर्धेचे नियोजन राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य मानसिंग जगताप यांनी केले. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शिवाजी पाटील, सचिन पाटील, नीलेश नाझरे, राजू यादव यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे सेक्रेटरी श्रीकांत अडीवरेकर, आर. डी. नार्वेकर, के. बी. गुरव, दिलीप जोशी, एम. बी. खरोशे, बंडोपंत कांबळे, आक्कासाहेब लाड, डी. ए. मांडवकर उपस्थित होते.

 

Web Title: Tendulkar, Chavan and Didde first in the fast bowlers competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.