चांदोली परिसरास दहा हजार पर्यटकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST2020-12-07T04:17:48+5:302020-12-07T04:17:48+5:30
कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून चांदोलीचे पर्यटन बंद होते. एक नोव्हेंबरपासून ते पुन्हा सुरू झाले आहे. आता दररोज शेकडो पर्यटक ...

चांदोली परिसरास दहा हजार पर्यटकांची भेट
कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून चांदोलीचे पर्यटन बंद होते. एक नोव्हेंबरपासून ते पुन्हा सुरू झाले आहे. आता दररोज शेकडो पर्यटक चांदोलीला भेट देत आहेत. येथील चांदोली धरणावर विनाशुल्क परवाना दिला जातो, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नाममात्र शुल्क आकारून प्रवेश करावा लागतो. ०१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरअखेर चांदोली परिसराला तब्बल दहा हजार पर्यटकांनी भेट दिली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दीड हजार पर्यटकांनी परवाना घेऊन जंगल सफारी केली आहे, तर साडेतीन हजार पर्यटकांनी मोफत परवाना घेऊन चांदोली धरण पाहण्याचा लाभ घेतला आहे. इतर दिवसांच्या तुलनेत शनिवार व रविवारी चांदोलीत पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
फोटो: ०६ चांदोली
चांदोलीला दररोज शेकडो पर्यटक भेट देऊन निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. ( छाया : सतीश नांगरे )