शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

महामार्गावर टेम्पोला अपघात, अडीच तासांनी जखमी चालकाला काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 14:51 IST

पुणे बंगळूर महामार्गावरील कणेगाव- घुणकी (ता. हातकंणगले) दरम्यान वारणा नदीच्या पुलानजीक आयशर टेम्पो नदीजवळील भरावात सुमारे शंभर फूट खाली जाऊन झाडाला जोरात धडकल्याने टेम्पोच्या पुढील बाजूचा चक्काचुर झाला. तब्बल अडीच तासाने झाडात अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश आले.  

ठळक मुद्दे पुणे-बंगलोर महामार्गावर टेम्पोला अपघात अडीच तासांनी जखमी चालकाला काढले बाहेर

किणी/कोल्हापूर : पुणे बंगळूर महामार्गावरील कणेगाव- घुणकी (ता. हातकंणगले) दरम्यान वारणा नदीच्या पुलानजीक आयशर टेम्पो नदीजवळील भरावात सुमारे शंभर फूट खाली जाऊन झाडाला जोरात धडकल्याने टेम्पोच्या पुढील बाजूचा चक्काचुर झाला. तब्बल अडीच तासांनी झाडात अडकलेल्या जखमी चालकाला बाहेर काढण्यात यश आले.  

चालक गंभीर जखमी होऊन अडकला होता.  ही घटना सकाळी  दहा वाजण्याच्या  सुमारास घडली.  त्याला बाहेर काढण्यासाठी उपस्थितांचे शर्तीचे प्रयत्न करून  तब्बल अडीचतासांनी बाहेर काढण्यात यश आले. भाऊ सिताराम झरे (वय.५५ रा.पाटण, जि. सातारा) असे चालकाचे नाव आहे.घटना स्थळावरून  मिळालेली अधिक माहिती अशी की  पुण्याहून आयशेर टेम्पो (एम.एच.११ ए.एल.०२२८) कोल्हापूरकडे भरधाव वेगाने चालला होता. वारणा नदीच्या पुलाजवळ  चालकाचा ताबा सुटल्याने सुमारे शंभर फूट भरावात जाऊन झाडावर जाऊन  आदळला. पुढील बाजूचा चक्काचुर झाल्याने  झाड आणि टेम्पो मध्ये चालकाचे पाय अडकले.

चालकाचा आरडाओरडा ऐकून सुरवातीस अन्य  वाहनातील प्रवाशी मदतीस धावले. मात्र चालकाचे पाय स्टेअरिंग व झाडात अडकल्याने निघाला नाही. प्रवाशासह नागरीकांनी अडीच  तासाहून अधिक काळ शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पण टेम्पो झाडात घुसल्याने चालकाला बाहेर काढणं अशक्य होते. त्यानंतर ट्रँक्टरच्या सहाय्याने चालकाला बाहेर  काढण्याचा प्रयत्न झाला पण तोही असफल झाला.

बाराच्या सुमारास  क्रेन व जेसीबी  व गॅस कटर आदीचा वापर करून नागरिकांच्या मदतीने चालकाला बाहेर  काढण्यासाठी आले  आहेत.  ही घटना पाहणासाठी वाहने थांबत असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर काही वेळासाठी  जुन्या पुलावरून दुहेरी वाहतुक सुरू ठेवली होती. घटनास्थळी १०८अ‍ॅब्युलन्सच्या  डॉ  प्रशांत ठाणेकर, पायलट भागवत कांबळे, हायवे गस्ती पथकाने जखमी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे.  पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी येथील वारणानदी जवळ आयशर टेम्पोचा अपघात झाला. (संतोष भोसले)

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर