सोनगेकरांनी लाॅकडाऊनच्या काळात उभारले मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:44+5:302021-01-18T04:21:44+5:30
दगड, मातीचे असणाऱ्या या मंदिरात गतवर्षी पुराचे पाणी शिरल्याने ते अधिकच जीर्ण झाले होते. ग्रामदेवतेच्या मंदिराची झालेली जीर्णवस्था गावकऱ्यांना ...

सोनगेकरांनी लाॅकडाऊनच्या काळात उभारले मंदिर
दगड, मातीचे असणाऱ्या या मंदिरात गतवर्षी पुराचे पाणी शिरल्याने ते अधिकच जीर्ण झाले होते. ग्रामदेवतेच्या मंदिराची झालेली जीर्णवस्था गावकऱ्यांना पाहवेना. त्वरित गावची बैठक घेऊन शासकीय निधीच्या मागे न लागता गावातूनच निधी जमा करायचा आणि श्रमदान करण्याचा निर्धार केला.
दरम्यान, लाॅकडाऊन असतानाही प्रशासनाचे नियम पाळत सर्वानीच योगदान दिले. त्यामुळे ४८ बाय ५८ लांबीचे मंदिर आकारास आले. परिसरात वास्तूकलेचा नमुना ठरलेल्या या मंदिराचा वास्तुशांती सोहळाही थाटामाटात करण्याचे नियोजनही गावकऱ्यांनी केले आहे .
वास्तुशांती सोहळ्याचे नियोजन असे रविवार (दि. २४) सकाळी महिला पाण्याचा कलश घेऊन मूर्तीची सवाद्य मिरवणूक, तर ११ वा. मंदिराची वास्तुशांती व होमहवन. दि.२५ रोजी सकाळी ९ वा. मूर्ती प्रतिष्ठापना व होमहवन, तर २६ रोजी सकाळी ९ वा. सत्यनारायण पूजा, सकाळी ११ वा. सिद्धगिरी मठाचे प. पू. काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या उपस्थितीत कलशारोहण होणार आहे, अशी माहिती देवालय कमिटीच्यावतीने देण्यात आली.
कँप्शन- सोनगे येथे लोकवर्गणी आणि श्रमदानातून पूर्ण झालेले चौंडेश्वरी देवीचे मंदिर.
छाया : रोहित लोहार