शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

भगवान बाहुबली मूर्तीस पंचामृत अभिषेकाने सोहळ््याची सांगता

By admin | Updated: May 26, 2015 01:07 IST

सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक : देशभरातील श्रावकांची उपस्थिती; हत्तीवरून जैन ग्रंथांची मिरवणूक

बाहुबली : णमोकार महामंत्र व भगवान बाहुबलींचा जयजयकार करत अत्यंत धार्मिक, भक्तीमय वातावरणात भगवान बाहुबली सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक सोहळ्याची सांगता झाली. संपूर्ण महामस्तकाभिषेक सोहळ्यास देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक उपस्थित राहिले होते. तर सोहळ्याच्या सांगता समारंभास हजारो भाविकांनी पुण्यलाभ घेतला. यावेळी दिगंबर मुनींसह अनेक त्यागीगण उपस्थित होते.विसाव्या शतकातील प्रथम जैनाचार्य १०८ शांतीसागर महाराज यांच्या प्रेरणेने गुरुदेव समंतभद्र महाराज यांनी १००८ भगवान बाहुबलींची २८ फूट उंचीची प्रतिमा ५० वर्षांपूर्वी स्थापन केली. त्या मूर्तीचा दर १२ वर्षांनी मस्तकाभिषेक सोहळा संपन्न होतो. यावर्षी हा सोहळा ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान विधिवत संपन्न झाला. याच सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक सोहळ्याची सांगता विविध कलशाभिषेकांनी झाली.या सांगता समारंभप्रसंगी महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी बाहुबलींचे शिक्षण क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाल्याचे सांगितले.महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष माजी जि. प. अध्यक्ष डी. सी. पाटील यांनी समाजबांधव, दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल, दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, बाहुबली संस्थचे शिक्षक, गुरुकूल स्नातक परिषदेचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा यांच्या सहकार्यामुळेच हा महामस्तकाभिषेक सोहळा पार पडला, असे सांगून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.सकाळी हत्तीवरून जैन ग्रंथांची मिरवणूक काढण्यात आली. त्याचा मान डॉ. नेमिनाथ बाळीकाई यांना मिळाला. पंचामृत अभिषेकाचा मान प्रमोद शहा यांना मिळाला. गोमटेश बेडगे हे भक्तामर विधानाचे मानकरी ठरले. यावेळी पूज्य मुनी स्वभावसागर महाराज व सुमतिसागर महाराज यांची मंगलप्रवचने झाली.