शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईचा भन्नाट जल्लोष --महोत्सवाला स्पर्धा नव्हे, संधी समजा

By admin | Updated: October 7, 2014 23:38 IST

शिवाजी विद्यापीठ : जिल्हास्तरीय युवा महोत्सवास उत्साही वातावरण सुरुवात, युवक-युवतींची गर्दी

महोत्सवाला स्पर्धा नव्हे, संधी समजाशिवाजी विद्यापीठ : जिल्हास्तरीय युवा महोत्सवास उत्साही वातावरण सुरुवात, युवक-युवतींची गर्दी कोल्हापूर : ठेका धरायला लावणारा लोकवाद्यवृंद, डोलविणारे लोकनृत्य, सामाजिक वास्तवाचे दर्शन घडविणाऱ्या लघुनाटिका, पथनाट्य तसेच ओसंडून वाहणारा उत्साह अशा भन्नाट वातावरणात आज, मंगळवारी ३४ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात दिवसभर तरुणाईने टेन्शन खल्लास असा जाम कल्ला केला. वादविवाद, एकांकिका, सुगम गायन, मूकनाट्य अशा सर्वच स्पर्धांमध्ये तरुणाईच्या कौशल्याचे दर्शन घडले. आपल्या संघाला, स्पर्धकाला टाळ्या, शिट्ट्यांनी ‘चिअर-अप’ करणाऱ्या युवक-युवतींनी वातावरणात रंग भरला. येथील राजाराम महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित या महोत्सवाला नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरुवात झाली. विविध ठिकाणी एकाचवेळी स्पर्धा सुरू करण्यासाठी संयोजकांची धावपळ सुरू होती. वादविवाद स्पर्धेत ‘हिंदी-चिनी भाईभाई : वास्तव की अभास’, ‘सोशल मीडिया’, आदी विषयांवर चांगलाच वाद रंगला. डॉ. बाळकृष्ण ग्रंथालय हॉलमधील लघुनाटिकेत २२ संघ सहभागी झाले. त्यांनी माळीण दुर्घटना, राजकारणाचे बदलते स्वरूप, व्यसनाधिनता, आदी विषयांबाबत प्रबोधन केले. तबला, सूरपेटी, बासरीच्या साथीने सुगम गायनाची सूरमयी सफर घडली. त्यात प्रसाद पवार, प्रतिभा चौगुले, अभयकुमार पोतदार, स्नेहल पाटील, सोनाली जाधव, प्रियांका कदम, संकेत पोरे, पूजा पाटील, आदींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दुपारी अडीचनंतर महोत्सवातील स्पर्धांचा वेग वाढला. खुलामंच येथील लोकवाद्यवृंदाद्वारे भारतीय पारंपरिक वाद्यांतून सादरीकरण करत आठ संघांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना ठेका धरायला लावले. लोकनृत्यामध्ये लावणी, कोळीनृत्य, भांगडा आदींनी उपस्थितांना डोलविले. खुलामंचचा परिसर गर्दीने फुलला होता. वाद्यवृंद आणि लोकनृत्याच्या सादरीकरणाला टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात दाद मिळत होती. यशवंतराव चव्हाण सभागृहात वीस संघांनी एकांकिका सादर केल्या. त्यात स्त्रियांवरील अत्याचार, पुनर्जन्म, आदी विषयांचे सशक्तपणे सादरीकरण करीत विचार करायला भाग पाडले. मूकनाट्यातून आतंकवाद, पर्यावरण रक्षण, महिला सुरक्षा आदींबाबत प्रबोधन करण्यात आले. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोरील आवारात पथनाट्यांचा फेर रंगला. त्यात २७ संघांनी सहभागी होत महागाई, मतदार जागृती, अंधश्रद्धा, आदी ज्वलंत प्रश्न मांडले. हिंदी, इंग्रजी आणि मराठीतील वक्तृत्व स्पर्धेत सामाजिक समस्यांवर स्पर्धकांनी प्रकाशझोत टाकला. (प्रतिनिधी)बिनधास्त तरुणाई...महोत्सवातील स्पर्धा, संघ आणि स्पर्धकांची तयारी तसेच त्यांना ‘चिअर-अप’ करणे. त्यात तरुणाईचा बिनधास्तपणा दिसून आला. राजाराम महाविद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरात तरुण-तरुणींचे फोटोशूट सुरू होते. महोत्सवात जिल्ह्यातील ५० महाविद्यालयांमधील सुमारे अडीच हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.नियोजनाचा सावळा-गोंधळ...नियोजनाचा सावळा-गोंधळ...संयोजकांनी सकाळी नऊ वाजता महोत्सवाच्या उद्घाटनाचे नियोजन केले होते. मात्र, प्रत्यक्षात अकरानंतर उद्घाटन झाले. निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे महोत्सवातील सर्व कार्यक्रम रात्री पावणे दहा वाजेपर्यंत सर्व स्पर्धा, कार्यक्रम पूर्ण करण्याच्या सूचना पोलिसांनी संयोजकांना दिल्या होत्या. त्यामुळे स्पर्धेच्या पूर्वी नियोजित केलेल्या वेळा आणि जागा यात बदल करण्यात आला. उदघाटनानंतरही तास उलटला, तरी स्पर्धा सुरू झालेल्या नव्हत्या. स्पर्धेच्या ठिकाणी परीक्षक हे स्पर्धकांची प्रतीक्षा करीत बसले होते. दुपारी एकच्या सुमारास स्पर्धांना सुरुवात झाली. स्पर्धक संघांची नोंदणी, स्पर्धेच्या ठिकाणांची माहिती, आदी बाबींमध्ये नियोजनातील सावळागोंधळ महोत्सवात ठळकपणे जाणवला.महोत्सवाला स्पर्धा नव्हे, संधी समजाअशोक भोईटे : पारदर्शकतेसाठी महाविद्यालयांना सांकेतिक क्रमांकशिवाजी विद्यापीठ : जिल्हास्तरीय युवा महोत्सवास उत्साही वातावरण सुरुवात, युवक-युवतींची गर्दी कोल्हापूर : महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाद्वारे युवा महोत्सव घेतला जातो. या महोत्सवाला स्पर्धा नव्हे, तर संधी समजा. त्यातून करिअरचा मार्ग शोधा, असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी आज, मंगळवारी येथे केले.येथील राजाराम महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या ३४ व्या कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहातील कार्यक्रमास विद्यापीठाचे ‘बीसीयुडी’ संचालक डॉ. अर्जुन राजगे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक आर. एम. कांबळे, डॉ. डी. आर. मोरे, प्राचार्य डॉ. वसंत हेळवी, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड प्रमुख उपस्थित होते.डॉ. भोईटे म्हणाले, महोत्सवात तरुणाई एकवटते. त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण होते. महोत्सवाच्या तयारीसाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी कष्ट घेतात. यावेळीच्या काही गंमती-जंमतीदेखील असतात. विविध कलागुणांना एक व्यासपीठ यातून मिळते. त्यामुळे महोत्सवाला निव्वळ स्पर्धा नव्हे, तर एक संधी समजा. त्यातून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचा मार्ग शोधावा. महोत्सवात पक्षपातीपणा होतो, अशी काही विद्यार्थ्यांची तक्रार होती. त्यावर यातील स्पर्धांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी विद्यापीठाने सहभागी महाविद्यालयांना सांकेतिक क्रमांक दिले आहेत. त्याद्वारेच महाविद्यालयांचे संघ त्यात सहभागी होतात. डॉ. राजगे म्हणाले, महाविद्यालयीन, विद्यापीठ पातळीवरील महोत्सवातून कलाकार घडले आहेत. त्यामुळे कला-गुणांना संधी देणाऱ्या महोत्सवांकडे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी करिअर निर्माण करण्याच्या दृष्टीने पाहावे. शैक्षणिक, ऐतिहासिक परंपरा असलेल्या राजाराम महाविद्यालयात यावर्षीचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव होत असल्याचा आनंद वेगळाच आहे.कार्यक्रमास मध्यवर्ती युवा महोत्सवाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, कलाकार नीलेश सावे, विद्यापीठ विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष पंकज मोरे, सचिव श्वेता परुळेकर, आदी उपस्थित होते. के. के. पाटील यांनी स्वागत केले. ए. बी. टिकेकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)पावसाने उडाली तारांबळ...सायंकाळी अचानकपणे पावसाने हजेरी लावल्याने महोत्सवातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, परीक्षक आणि संयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली. खुल्या रंगमंचावर सुरू असलेली लोकनृत्य स्पर्धा अर्ध्यावर थांबविण्यात आली. पावसापासून बचाव व्हावा यासाठी महाविद्यालयातील वर्ग खुले करण्यात आले. तसेच यशवंतराव चव्हाण सभागृहात लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आली.